मुख्यमंत्रीसाहेब इतके निर्दयी कसे झाले, मातोश्रीबाहेर बॅनर लावून मनसेचा सवाल

मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता एक नवीन वर्ष आले. गोड बातमी तर दूर राहिली पण जनतेचे हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तर वीज बिल भरा असे उर्जामंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? असा सवाल करणारा बॅनर मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर लावला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता एक नवीन वर्ष आले, गोड बातमी तर दूर राहिली पण जनतेचे हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तर वीज बिल भरा असे उर्जामंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? असा सवाल करणारा बॅनर मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर लावला आहे. How did the Chief Minister become so ruthless, MNS questioned by putting up a banner outside Matoshri

मुख्यमंत्री वाढीव वीज बिलांचं काय झालं? असा सवालही या बॅनरद्वारे विचारण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिलं पाठवण्यात आली. याबाबत आधी वीज बिलांमध्ये सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र तशी कोणतीही सवलत देण्यात आली नाही. लॉकडाउनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक अडचणी सहन कराव्या लागल्या. त्यामुळे सरकारने वाढीव वीज बिलांचा विचार करावा असं आवाहन मनसेने केलं होतं. तसेच भाजपानेही वारंवार लोकांना वाढीव वीज बिलांमधून सवलत द्यावी अशी मागणी केली होती. मात्र यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही.

How did the Chief Minister become so ruthless, MNS questioned by putting up a banner outside Matoshri

आधी सरकारकडून आश्वासन देण्यात आलं आणि नंतर घूमजाव करण्यात आलं. त्यामुळे मनसेने नव्या वर्षाच्या शुभेच्छांचं बॅनर लावत असतानाच त्याच बॅनरमधून मुख्यमंत्र्यांना वाढीव वीज बिलांवरुन प्रश्न विचारत टीका केली आहे. वाढीव वीज बिलं माफ केली जावीत, अशी मागणी करण्यात आली होती. भाजपा आणि मनसेनेही मागणी केली होती. मात्र आश्वासनांशिवाय काहीही मिळालं नाही. आता बॅनरमधून टीका करत मनसेने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*