गृहिणींनी घरातील सर्व कामे करणे अपेक्षित नाही ; पुरुषप्रधान संस्कृतीला उच्च न्यायालयाचा दणका


वृत्तसंस्था

मुंबई  : लग्न हे समानतेवर आधारीत असते. त्यामुळे गृहिणींनी घरातील सर्व कामे करणे अपेक्षित नाही, असे सांगून आज पुरुषप्रधान संस्कृतीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. Housewives are not expected to do all the housework high court

पत्नीनं सकाळचा चहा बनवला नाही म्हणून तिची डोक्यात हातोडा घालून पतीने हत्या केली होती. पत्नीच्या रक्तानं आंघोळ करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सहा वर्षांच्या मुलीसमोरच हा प्रकार घडला होता. त्या चिमुकलीनं वडिलांच्या विरोधात साक्षही दिली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं हा निर्णय दिला.‘पत्नी म्हणजे मालमत्ता नाही’

न्या. रेवती मोहिते -डेरे यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. ‘पत्नी ही मालमत्ता किंवा वस्तू नाही. लग्न हे भागिदारी व समानतेवर आधारले आहे. या प्रकरणाच्या केसमध्ये ही बाब कुठंही आढळत नाही. या गोष्टी लैंगिक असमानता आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. समाज आणि संस्कृतीमध्ये आढळणाऱ्या या गोष्टी वैवाहिक नातेसंबंधातही आढळतात,’ असे ताशेरे त्यांनी ओढले.

Housewives are not expected to do all the housework high court

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी