नागपुरात हॉटेलला 9 वाजेपर्यंतच परवानगी, कोरोना वाढल्याने अनेक निर्बंध


कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागपुरात हॉटेल्स रात्री 9 वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागपुरात हॉटेल्स रात्री 9 वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. Hotels school marriage hall in Nagpur will be closed due to Corona

नागपूरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे नागरिकांवर अनेक निर्बंध पालकमंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले . आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद राहिल. 7 मार्च पर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील.हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील. सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्च पर्यंत बंद राहतील. मंगल कार्यालय 25 फेब्रुवारी नंतर 7 मार्च पर्यंत बंद राहणार…

त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल… मंगल कार्यालय मध्ये 7 मार्च पर्यंत लग्न होणार नाही. बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार, आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार आहेत. नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार..

Hotels school marriage hall in Nagpur will be closed due to Corona

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी