मुंबईत घरविक्रीचा नवीन विक्रम होण्याची शक्यता, मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात 7,344 घरांची विक्री


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लॉकडाउनमुळे सर्व क्षेत्राला आर्थिक फटका बसला. मात्र महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्याने गेल्या वर्षी डिसेंबरप्रमाणेच यंदाही घर खरेदीदारांचा उत्साह कायम दिसत आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात 7,344 घरांची विक्री झाली. मार्च महिन्यात मुंबईत घरविक्रीचा नवीन विक्रम होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.Home sales likely to hit a new record in Mumbai 7,344 homes sold in the first fortnight of March

गृहनिर्माण क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे घर खरेदीला चालना मिळाली. यातच विकसकांनाही घर खरेदीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचे जाहीर केले.यामुळे यंदा खरेदीदारांकडून घर खरेदीची लगबग सुरू आहे. 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत मुंबईत 19 हजार 581 घरांची विक्री झाली होती. यामुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा झाला होता.

राज्य सरकारने 2020 मध्ये मुद्रांक शुल्क कमी करण्याची घोषणा केली. त्यानुसार डिसेंबर 2020 पर्यंत तो 3 टक्के तर जानेवारी 2021 ते मार्च 2021 पर्यंत तो 2 टक्के कमी केले आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात विक्रमी घरांची खरेदी झाल्याची नोंद झाली.

सरकारने दिलेली सवलत मार्चपर्यंत असल्याने ग्राहक त्याला प्रतिसाद देत आहेत. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात मुंबईत एकूण 10 हजार 412 घरांची विक्री झाली, तर फेब्रुवारीत 15 हजार 172 घरांची विक्री झाली होती.

मार्च महिन्यात मुंबईत घरविक्रीचा नवीन विक्रम होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या महिन्याच्या पहिल्या 17 दिवसांत 7 हजार 344 घरांची विक्री झाली असल्याची नोंद नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे झाली आहे. मुद्रांक शुल्कात मार्च अखेरपर्यंत सवलत असल्याने घर विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Home sales likely to hit a new record in Mumbai 7,344 homes sold in the first fortnight of March

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती