गृहमंत्र्यांचे टार्गेट १०० कोटींचे तर इतर मंत्र्यांचे किती? केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट देण्याच आरोप लागले आहेत. तर आता प्रश्न उपस्थित होतो की, देशमुख ही वसुली आपल्यासाठी करत होते, का राष्ट्रवादी किंवा शिवसेनेसाठी करत होते ? जर गृहमंत्र्यांचे टार्गेट 100 कोटी होते, तर इतर मंत्र्यांचे किती होते ? फक्त मुंबईतून 100 कोटींची वसुली हवी होती, तर राज्यातील इतर मोठ्या शहरांसाठी किती टार्गेट दिले आहे ? असा सवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट देण्याच आरोप लागले आहेत. तर आता प्रश्न उपस्थित होतो की, देशमुख ही वसुली आपल्यासाठी करत होते, का राष्ट्रवादी किंवा शिवसेनेसाठी करत होते ? जर गृहमंत्र्यांचे टार्गेट 100 कोटी होते, तर इतर मंत्र्यांचे किती होते ? फक्त मुंबईतून 100 कोटींची वसुली हवी होती, तर राज्यातील इतर मोठ्या शहरांसाठी किती टार्गेट दिले आहे ? असा सवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. Home Minister’s target of Rs 100 crore, what is the target of other ministers? Question from Union Minister Ravi Shankar Prasadअँटीलिया प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर बोलताना प्रसाद म्हणाले की, सचिन वाझे कुणाच्या दबावात होते. शिवसेना, मुख्यमंत्री का शरद पवारांच्या दबावात ? हे फक्त भ्रष्टाचाराचे प्रकरण नाही, हे ऑपेरेशन लूट आहे. वसुली गुन्हा आहे, याप्रकरणी सत्ताधारी शरद पवारांना ब्रीफ करत आहेत. शरद पवार सत्तेत नाहीत, तर मग सर्वजण शरद पवारांना ब्रीफींग का करत आहेत ?

एकीकडे मुख्यमंत्री सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, दुसरीकडे गृहमंत्री वाझेंना शंभर कोटींचे वसुली टार्गेट देतात. एका इंस्पेक्टरच्या बचावासाठी मुख्यमंत्र्यांना यावे लागते. वाझेला का वाचवले जात आहे ? सचिन वाझेकडे असे कोणते गुपित आहेत, जे बाहेर आल्यावर सरकारला धोका निर्माण होईल ? हे गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणाची गांभीयार्ने चौकशी व्हायला हवी, अशी मागणी प्रसाद यांनी केली आहे.

Home Minister’s target of Rs 100 crore, what is the target of other ministers? Question from Union Minister Ravi Shankar Prasad

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*