गृहमंत्रीजी तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…चंद्रकांत पाटील यांचा अनिल देशमुखांवर हल्लाबोल


भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) चुकीचा उल्लेख झाल्याचा कांगावा केला जात आहे. याच्यामागे कोण आहे, हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) चुकीचा उल्लेख झाल्याचा कांगावा केला जात आहे. याच्यामागे कोण आहे, हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे. Home Minister, if you were really so compassionate about women’s dignity … Chandrakant Patil’s attack on Anil Deshmukh

भाजपाच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाऐवजी चुकीचा शब्द वापरण्यात आला असल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यावरून बरीच चर्चाही सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याची दखल घेत कारवाईचा इशारा दिला.

मात्र, गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर आक्षेप नोंदवत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल असा अपमानास्पद उल्लेख पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने आपणहून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असे देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

या प्रकरणावर रक्षा खडसे म्हणाल्या की, महिला लोकप्रतिनिधीबाबतचा आक्षेपार्ह उल्लेख असलेला स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याबद्दल आपल्याला दु:ख होत आहे. एखाद्या महिलेबाबतच्या प्रकरणात सत्ताधारी किंवा विरोधकांनी यामध्ये राजकारण न करता अशा गोष्टी व्हायरल करायला नकोत. ही गोष्ट बुधवारी संध्याकाळी माझ्या लक्षात आली. त्यानंतर लगेच मी ज्यावेळी वेबसाईटवर जाऊन पाहिलं तेव्हा ते रावेरचं होतं. पण काही लोकांचं म्हणणं आहे की गुगल ट्रान्सलेटरवर रावेर शब्द टाकल्यास त्याचे वेगवेगळे उच्चार आणि अर्थ येत आहे. पण हे भाजपाकडून केलं गेल असेल असं मला वाटत नाही. कारण माझ्याकडे व्हॉट्सअ‍ॅपवर जे मेसेज आले किंवा जे स्क्रीनशॉट पाठवले गेले ते सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी या फेसबुक पेजवरील आहेत. हे पेज कोण चालवतंय ते आम्हाला माहिती नाही. यासंदर्भात माझं जिल्हा पोलीस प्रमुखांशी आणि पक्षाच्या लोकांशी बोलणं झालं असून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

रक्षा खडसे म्हणाल्या की, याप्रकरणी मला एकच म्हणायचं आहे की, कोणीही ही गोष्ट केलेली असली तरी एका महिलेबाबत विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त व्हायरल करण्याची गरज नाही. कारण तुम्ही एका महिलेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. एक लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीची देशभरात चर्चा केली जात आहे.

Home Minister, if you were really so compassionate about women’s dignity … Chandrakant Patil’s attack on Anil Deshmukh

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती