खासदार डेलकर आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्यांना गोवण्याचा गृहमंत्री देशमुखांचा प्रयत्न, माजी आयुक्त परमबीर सिंग यांचा आरोप

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे दादरा – नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्यांना गोवण्याचा प्रयत्नात होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. Home Minister Deshmukh’s attempt to implicate BJP leaders in MP Delkar suicide case, former Commissioner Parambir Singh


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे दादरा – नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्यांना गोवण्याचा प्रयत्नात होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ( यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशी मागणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग   यांनी केली आहे. या प्रकरणी परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. या याचिकेतून परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केला आहे.मुंबई पोलीस आयुक्तपदावरून केलेली बदली ही मनमानी आणि बेकायदेशीर आहे. आपल्या बदलीचा आदेश रद्द करवा. आपली बदली रोखावी आणि देशमुख यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सीबीआयला निर्देश द्यावेत, अशी मागणी परमबीर सिंग यांनी केली आहे.

देशमुख यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना डावलून इंटेलिजन्स विभागाचे सचिन वाझे आणि समाज सेवा शाखेचे एसीपी संजय पाटील यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांची आपल्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत त्यांना महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले गेले. यासह इतर संस्थांकडूनही खंडणी घेण्याचे निर्देश दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

Home Minister Deshmukh’s attempt to implicate BJP leaders in MP Delkar suicide case, former Commissioner Parambir Singh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*