व्वा… महाराष्ट्राचे गृहमंत्री गुटखा किंग, तडीपार, ट्रकचोर यांच्या गराड्यात उभे… पण कोठे?


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : ठाकरे – पवार सरकारमधले राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गृहमंत्र्याच्या शेजारी उभ्या असलेल्या या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.home minister anil deshmukh with three gundas in aurangabad

औरंगाबाद महापालिकांच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यूहरचनेच्या दृष्टीने गृहमंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा होता. या दौऱ्यातच कलीम कुरेशी, जफर बिल्डर आणि सय्यद मतीन या तीन अट्टल गुन्हेगारांनी अनिल देशमुखांसमवेत फोटो काढून घेतले.

एकावर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे. दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे. तर अन्य एकावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी आरआर पाटील यांच्या समवेत एक गुन्हेगार उभा असल्याचा फोटो समोर आला होता. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना देखील एका गुन्हेगारांसोबत फोटो पाहायला मिळाला. मात्र येथे गुन्हेगारांच्या मधेच गृहमंत्री असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहे. तर सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. या तिघांवर औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यातील सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे तो बराचकाळ जेलमध्ये होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील पोलीस हातकड्या घालून हजेरी लावत होता.

गुन्हेगार कोण, गुन्हे काय?

  • कलीम कुरेशी – औरंगाबाद शहरात याची गुटखा किंग म्हणून ओखळ आहे. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी मध्यंतरी ड्रग्स प्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये देखील याची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
  • सय्यद मतीन – बलात्कार, यासह अन्य गुन्हे या मतीनवर दाखल आहेत. तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित आहे.
  • जफर बिल्डर – हा 500 ट्रक चोरून सुटे करून विकणाऱ्या टोळीतील गुन्हेगार आहे.

या तिघांनीही गृहमंत्र्यांशेजारी पोज देऊन फोटो काढून घेतला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूकीत हा फोटो अत्यंत गाजणारा ठरू शकतो.

home minister anil deshmukh with three gundas in aurangabad

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी