पोलीस अधिकाऱ्यांवर चूक ढकलून गृहमंत्री अनिल देशमुख नामानिराळे, बदल्यांबाबत केले मोठे वक्तव्य

  • मुंबई पोलीसांकडून अंबानी स्फोटक प्रकरणाचा अक्षम्य चुका झाल्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी मान्य केले. मात्र, सर्व चुका पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलून ते नामानिराळे झाले आहेत. या प्रकरणी मी राजीनामा देणार नाही असे त्यांनी सांगितले.

  •  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी काही पोलीस अधिकाऱ्यांकडून अक्षम्य चुका झाल्या आहेत. त्या माफ करण्यासारख्या नव्हत्या, त्यामुळे या पोलीस दलात या बदल्या करण्यात आल्या असल्याची कबुली अनिल देशमुख यांनी दिली आहे. Home Minister Anil Deshmukh made a big statement about the transfer by pushing the mistake on the police officers

मुंबई : मुंबई पोलीसांकडून अंबानी स्फोटक प्रकरणाचा अक्षम्य चुका झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मान्य केले. मात्र, सर्व चुका पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलून ते नामानिराळे झाले आहेत. या प्रकरणी मी राजीनामा देणार नाही असे त्यांनी सांगितले.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी काही पोलीस अधिकाऱ्यांकडून अक्षम्य चुका झाल्या आहेत. त्या माफ करण्यासारख्या नव्हत्या, त्यामुळे या पोलीस दलात या बदल्या करण्यात आल्या असल्याची कबुली अनिल देशमुख यांनी दिली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राज्य सरकारने पोलीस दलात महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. ‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना देशमुख यांनी बदल्या या प्रशासकीय नसून अधिकाऱ्यांच्या झालेल्या चुकांमुळे असल्याचेही त्यांनी सांगितले.सचिन वाझे यांच्या अटकेने मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याबाबत देशमुख म्हणाले, अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात तपास करताना आमच्या अधिकाºयांकडून गंभीर चुका झाल्या, असे मी मान्य करतो. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच परमबीर सिंग यांची आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आह, या प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून एका गुन्ह्याचा तपास एनआयए करत आहे तर दुसºया गुन्ह्याचा तपास एटीएस करत आहे. या चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. यात कोणत्याही दजार्चा अधिकारी दोषी आढळला तरी त्याची गय केली जाणार नाही. चौकशीत ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या अक्षम्य होत्या. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आयुक्तांच्या बदलीचा निर्णय घेतला. चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणूनच हे पाऊल उचलले.

Home Minister Anil Deshmukh made a big statement about the transfer by pushing the mistake on the police officers

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*