गुगल ट्रान्सलेटरची माहिती नसल्याने गृहमंत्री अनिल देशमुख पडले तोंडावर; रक्षा खडसेवरून भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न आला अंगलट

Home Minister Anil Deshmukh did not know about Google Translate; His attempt Failed to target BJP Via MP Raksha Khadse

इतरांना ट्रोल करण्याच्या नादात स्वत:चे अज्ञान जगजाहीर करणारे कमी नाहीत. असाच प्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या ट्वीटमुळे समोर आला आहे. रक्षा खडसेंवरून भाजपला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात त्यांचे अज्ञान दिसून आले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ते ट्वीट शेअर करत संपूर्ण माहिती घेण्याआधी भाजपवर कारवाई करण्याचे सांगून स्वत:चे हसे करवून घेतले आहे. Home Minister Anil Deshmukh did not know about Google Translate; His attempt Failed to target BJP Via MP Raksha Khadse


विशेष प्रतिनिधी

मुंबई : इतरांना ट्रोल करण्याच्या नादात स्वत:चे अज्ञान जगजाहीर करणारे कमी नाहीत. असाच प्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या ट्वीटमुळे समोर आला आहे. रक्षा खडसेंवरून भाजपला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात त्यांचे अज्ञान दिसून आले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ते ट्वीट शेअर करत संपूर्ण माहिती घेण्याआधी भाजपवर कारवाई करण्याचे सांगून स्वत:चे हसे करवून घेतले आहे.

सातत्याने भाजपविरोधात पोस्ट करून ट्रोल करणाऱ्या स्वाती चतुर्वेदी यांनी बुधवारी एक ट्वीट शेअर केले. ज्यात भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर “समलैंगिक” असल्याचे आक्षेपार्ह वर्णन होते. यावरून पत्रकार म्हणवल्या जाणाऱ्या स्वाती चतुर्वेदी यांनी कोणतीही जास्त माहिती न घेता तो फोटो शेअर करत त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, पीएमओ इंडिया यांना टॅग करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

स्वाती चतुर्वेदी यांच्या या ट्वीटची ‘तत्परतेने’ दखल घेत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही भाजपला कारवाईचे संकेत दिले. स्वाती चतुर्वेदी यांचे ट्वीट शेअर करताना गृहमंत्री म्हणाले की, महिलांविषयीचा हा अनादर सरकार खपवून घेणार नाही आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

परंतु, गुगल ट्रान्सलेट कसे काम करते हे जर त्यांना कळले असते तर त्यांचेच हसे झाले नसते. त्यांनी ट्वीट आधी भाषांतरातील ही त्रुटी निदर्शनास आणली असती तर… पण टोकाचा भाजपविरोध आणि टीकेची तीव्र इच्छा यामुळे त्यांनी यात थेट भाजपचाच दोष असल्याचे सांगून टाकले.



आता गुगल ट्रान्सलेट काय ते समजून घ्या?

हे संपूर्ण प्रकरण गुगल ट्रान्सलेटमुळे वादात रूपांतरित झाले आहे. भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर वाचकांना सर्व कंटेंट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत पाहण्याचा पर्याय आहे. एखाद्याला वेबसाइटचा कंटेंट हिंदीमध्ये पाहायचा असल्यास गुगल ट्रान्सलेटवरून ते भाषांतरित केले जाते.

Home Minister Anil Deshmukh fell on his face as he did not know about Google Translate; An attempt was made to target BJP Via MP  Raksha Khadse

आता या प्रकरणात गुगल ट्रान्सलेशनने रावेर या शब्दाचे चुकीचे भाषांतर केल्याचे दिसते. रावेर हे स्थळाचे नाव न समजता गुगलने हिंदी शब्द समजून त्याला ‘समलैंगिक’मध्ये रूपांतरित केले. यावरून गुगल ट्रान्सलेशनमुळे झालेल्या चुकीचे खापर भाजपवर फोडण्यात काहीही अर्थ नाही हे स्पष्ट होते.

इंटरनेटवर ट्रान्सलेशन कसे होते, याची कल्पना नसलेल्या स्वाती चतुर्वेदी यांनी भाजपावर आरोप केले. भारतीय नावे चुकीच्या पद्धतीने अनुवादित करणाऱ्या टेक दिग्गज गुगलविरुद्ध बोलण्याऐवजी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना यात ओढून एकप्रकारे त्यांचाही अनादर केला आहे.

गुगलच्या त्रुटीमुळे खडसे यांच्या मतदारसंघाचे नाव चुकीच्या पद्धतीने अनुवादित झाले.

गोंधळानंतर गुगलने सुधारली आपली चूक

या सर्व प्रकारानंतर गुगलने तांत्रिक त्रुटी ओळखल्या आणि त्या सुधारल्या. गुगलने त्वरित हस्तक्षेप केल्याने आता भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘रावेर’शब्दाचे अचूक हिंदी भाषांतर दिसत आहे.

Home Minister Anil Deshmukh did not know about Google Translate; His attempt Failed to target BJP Via MP Raksha Khadse

कोण आहेत स्वाती चतुर्वेदी?

स्वाती चतुर्वेदी या स्वत: पत्रकार असल्याचे सांगतात. त्यांना इंटरनेटबद्दल चांगली माहिती नाही, हे त्यांनी याआधीही सिद्ध केलेले आहे. नुकताच त्यांनी दावा केला होता की, त्यांनी गुगलवर मोदींच्या लग्नाचे फोटो सर्च केले होते, तेव्हा त्यांना तशा इमेज सर्चमध्ये सापडल्या होत्या. परंतु त्यांनी हा विचार केला नाही की, पंतप्रधान मोदी स्वत: एखाद्या लग्नाला हजेरी लावू शकतात, एखाद्या लग्नसोहळ‌्या सहभागी होऊ शकतात. परंतु त्यांनी मात्र हे मोदींच्याच लग्नाचे फोटो असल्याचा स्वत:चा समज करून घेतला. किती हे अज्ञान! जेव्हा नेटकऱ्यांनी त्यांना त्यांची चूक निदर्शनास आणून दिली तेव्हा या महोदयांनी याचे खापर गुगलवरच फोडले होते बरं का!

Home Minister Anil Deshmukh did not know about Google Translate; His attempt Failed to target BJP Via MP Raksha Khadse

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था