गृहविभागातील बदल्यांचा गोलमाल, अर्थकारणाला कंटाळून येरवडा कारागृह अधीक्षकाने मागितली इच्छामरणाची परवानगी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बदल्यांसाठी सुरू केलेल्या अर्थकारणामुळे चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खच्चीकरण होत आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहाच्या अधीक्षकांनी तर या अर्थकारणाला कंटाळून थेट इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.Home Department Transfers, Yerawada jail superintendent seeks permission for euthanasia


विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बदल्यांसाठी सुरू केलेल्या अर्थकारणामुळे चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खच्चीकरण होत आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहाच्या अधीक्षकांनी तर या अर्थकारणाला कंटाळून थेट इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

येरवडा कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव तडकाफडकी बदली करण्यात आल्याने नाराज आहेत. त्यांनी म्हटले आहे की, माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. गृहखात्यातील अर्थकारणामुळेच हा प्रकार होत आहे. मला इच्छा मरणाची परवानगी न दिल्यास परवानगी असल्याचं गृहित धरणार आहे.पोलीस दलातील बदल्यांवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरलेले आहे. त्यातीलच एक प्रकरण पुन्हा समोर आले असून गृह विभागात अर्थपूर्ण तडजोडींशिवाय बदल्या होत नसल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गृहखात्यातील बदल्यांच्या रॅकेटचा पदार्फाश केला आहे. थेट केंद्रीय गृहसचिवांकडे याप्रकरणाची तक्रार करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सरकारभोवती संकटाचं हे वादळ घोंगावत असतानाच पुण्यातील कारागृह अधीक्षक हिरालाल जाधवि यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे.

सचिन वाझे प्रकरणात ठाकरे- पवार सरकारने परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. त्यांना होमगार्डचे प्रमुख केले होते. मात्र ही आपली पदावनती असल्याने सिंग नाराज झाले होते. तसेच सिंग यांची बदली करताना त्याचे कारणही दिले नव्हते.

ही शिक्षा असल्याची भावना निर्माण झाल्यानेच त्यांनी थेट गृहमंत्र्यांचे कारनामे एका लेटरद्वारे बाहेर काढले होते. राज्य पोलीस दलातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनीही बदलीमुळे उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Home Department Transfers, Yerawada jail superintendent seeks permission for euthanasia

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*