हिंदु समुहाच्या दबावानंतर दहशतवादशी संबंध दर्शविणारे पुस्तक प्रकाशकाने काढले रद्दीत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ब्रिटीश जीसीएसई अंतर्गत या धार्मिक अभ्यासासाठी असणाऱ्या अभ्यासपुस्तकात(वर्कबुक) हिंदुचा दहशतवादांशी संबंध दाखविण्यात आला होता. या समावेशामुळे हिंदुबांधवांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. हिंदु समूहाचा वाढता दबाव आणि भावना लक्षात घेऊन प्रकाशकाने आपल्या संकेतस्थळावरील मजकूर हटविण्याबरोबरच हे पुस्तक रद्दीत काढले आहे.

जीसीएसई अंतर्गत अ स्तरावर होणाऱ्या परिक्षांसाठी अँक्वा लोगोसह या पुस्तकाची रचना करण्यात आली होती. एवढ्यावरच न थांबता हा लोगो आणि माहिती पुस्तक प्रकाशकाने वेस्ट मिडलँन्डमधील स्कूल ऑफ सोलीहुल या माध्यमिक शाळेने शैक्षणिक बाब म्हणून आपल्या संकेतस्थळावर ही माहिती स्वतंत्र सेक्शनमध्ये ही अपलोड करून घेतली होती

पुस्तकातील चार पाने ही ही हिंदुझम या विषयांवर देण्यात आलेली होती. या धार्मिक पुस्तकात आपल्याला न्याय मिळविण्यासाठी युध्द करणे हे गरजेचे आहे, ती एक नैतिकताच आहे,से धर्म सांगतो,अर्जुन हा क्षत्रीय होता आणि आपल्या हक्कांसाठी त्यांने देखील युध्द केले होते आणि युध्दाशिवाय पर्यायच नाही,असे त्यांने म्हटले होते, ही आठवण पुस्तकात करून दिलेली आहे.

याच तत्वानुसार हिंदुनी स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र हातात घेणे हे न्यायिक आहे म्हणूनच आक्रमण करणाऱ्याना उत्तर देण्यासाठी भारतात न्युक्लियरची निर्मिती केली आहे. काही हिंदुनी आपली धार्मिक श्रध्दा,परंपरा जपण्यासाठी ते दहशतवादाकडे वळले आहे. न्यायिकतेसाठी शासनानेही योग्य पध्दतीने पावले उचलण्यासाठी अशा पध्दतीचा वापर करावा असे अर्थशास्त्राने म्हटले आहे.

हिंदु फोरम ऑफ ब्रिटन(एचएफबी) च्या अध्यक्षा तृप्ती पटेल यांनी म्हटले आहे की, हिंदुची परंपरा,रूढी या मोठ्याच आहे, पण पंरपरा,रूंढीचा घात करण्याचा प्रयत्न ब्रिटिश हिंदुजने केला आहे. हिंदुना जाणूनबूजून बदनाम करण्याच्या दृष्टीने हा एक कुटील डाव असून याला राजकीय वास येत असल्याचे नमूद केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*