केरळमध्ये हिंदू – ख्रिश्चन स्ट्रॅटेजिक अलायन्सला आकार!!; मुस्लिम समूदायाचा वाढता प्रभाव आणि काँग्रेसची कमजोरी यावर उपाय!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमध्ये मीडियाने बहुतेक सगळे लक्ष पश्चिम बंगालवर केंद्रीत केले असताना सुदूर दक्षिणेत केरळमध्ये बऱ्याच खोलवर रूजणाऱ्या राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. त्याकडे मीडियाचे फारसे लक्ष दिसत नाही. Hindu – christen stratagic allience in kerala assembly election offing

 • केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफने आपले लक्ष मुस्लिम लीगसमवेत मुस्लिम वोट बँकेवर केंद्रीत केले असताना भाजप शांतपणे हिंदू – ख्रिश्चन स्ट्रॅटेजिक अलायन्स घडविण्याच्या बेतात आहे. एका निवडणूकीपुरते किंवा केवळ काँग्रेसला काटशह म्हणून हे अलायन्स होताना दिसत नसून ते तुलनेने दीर्घकाळ केरळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर परिणामकारक राहील, असे पाहिले जात आहे.
 • केरळमध्ये शबरीमलाचा मुद्दा, लव्ह जिहाद यांच्यासारख्या मुद्द्यांनी गंभीर राजकीय स्वरूप धारण केल्यानंतर भाजप आणि ख्रिश्चन समुदाय एकत्रितपणे विचार करायला सुरूवात झाली. त्याला या निवडणूकीच्या निमित्ताने मूर्त रूप येताना दिसते आहे.

Kerala Assembly Elections 2021 : डाव्या – काँग्रेसच्या गॉलिएथवर भाजपच्या डेव्हीडचा गोफणीचा निशाणा


 • जेकबाइट चर्चच्या प्रतिनिधींनी कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. केरळ विधानसभेच्या ५ मतदारसंघांमध्ये जेकबाइट्स ख्रिश्चन समूदायाचा प्रभाव आहे. तिथे सहमतीने उमेदवार देण्याचे निश्चित करण्यात आले.
 • जेकबाट्स समूदायाचा सिरियन ऑर्थोडॉक्स चर्चशी जुना वाद आहे. तो सोडविण्याच्या दृष्टीने अमित शहा यांच्या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
 • लव्ह जिहादचा मुद्दा हिंदू संघटना जेवढ्या मोठ्या प्रमाणावर लावून धरत आहेत, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन समूदाय किंवा चर्च तो मुद्दा लावून धरत नव्हते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून यात बदल पाहायला मिळतोय. ख्रिश्चन समूदायातही लव्ह जिहादबाबत असंतोष पसरलाय. चर्च तो मुद्दा उचलून धरताना दिसतेय.
 • इथेच भाजपच्या आणि ख्रिश्चन समूदायाच्या मुद्द्यांमध्ये मोठे साम्य आहे. याचा अर्थ बाकीचे मतभेदाचे मुद्दे संपलेत असे नाही, तर समान मुद्द्याच्या दिशेने ही वाटचाल दिसतेय. कारण काँग्रेस प्रणित यूडीएफ मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समूदायाचे मुद्दे निवडणूकीत आणताना दिसते आहे.
 • याचा परिणाम काँग्रेसवरही होताना दिसतोय. काँग्रेसमधले ख्रिश्चन समूदायाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर तिथे पक्षाला गळती लागते. पी. सी. चाको आणि विजयन थॉमस यांच्यासारखे निष्ठावान काँग्रेस नेते पक्ष सोडतात. त्याने पक्षाला मोठे नुकसान झाल्यासारखे वाटत नाही. पण हा भाजपसाठी मोठा फायदा आहे.
 • सामाजिक स्वीकाराचा हा फायदा आहे. पारंपरिक हिंदू मतदाराबरोबर ख्रिश्चन मतदार जोडण्याचा हा प्रयत्न आहे.
 • भाजपच्या मतांची टक्केवारी ५, १६ आणि १९ टक्के अशी राहिली आहे. २०१४ ते २०२० या सहा वर्षांमधली ही मतांच्या टक्केवारीतली प्रगती आहे. आता पक्षाला ब्रेकइव्हन पाहिजे. तो ३ ते ४ टक्के मते वाढली, आणि काँग्रेस प्रणित आघाडीची तेवढी मते कमी झाली, तर २५ ते ३५ जागांच्या छोट्या विजयामध्ये त्या मतांचे रूपांतर होऊ शकते. निदान आकडेवारी तरी तसे सांगते.
 • अर्थात भाजपच्या नेतृत्वाने नेमकी जागांची आकडेवारी न सांगण्याची खबरदारी घेतली आहे. कारण सध्या केरळच्या विधानसभेत भाजपचा फक्त १ आमदार आहे. अशा स्थितीत भाजपला मोठा पल्ला गाठायचाय.
 • इ. श्रीधरन यांची इमेज मध्यमवर्गीय मतदारांवर विशेषतः नवमतदारांवर प्रभाव पाडण्याची भाजपला आशा आणि अपेक्षा आहे. नवमतदाराचे मतदान जितके वाढेल, तेवढा भाजपला फायदा आहे. नगरपालिका, पंचायत निवडणूकीत तो दिसला आहे. विधानसभेसाठी ती टक्केवारी वाढविण्याचे भाजपपुढे आव्हान आहे.
 • अळापुळळा मलानकरा सिरियन ऑर्थोडॉक्स चर्च भाजपच्या बालाशंकर यांनी वाचविले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा, नितीन गडकरी यांच्यापर्यंत सगळ्यांनी हे चर्च वाचविण्यासाठी मदत केली. कारण राष्ट्रीय महामार्ग बरोबर चर्चच्या मधून जात होता. हे ऐतिहासिक वारसा असलेले चर्च पाडावे लागणार होते. पण राष्ट्रीय महामार्ग दुसरीकडून वळविण्यात आला आहे.
 • चर्च आणि चर्चच्या परिसरात राहणाऱ्या ४२५ कुटुंबांची पारंपरिक घरे वाचली आहेत. फादर अलेक्झांडर वेट्टापट्टू यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अशा घटनांचा परिणाम निवडणूकीत दिसणे अपेक्षित आहे.

Hindu – christen stratagic allience in kerala assembly election offing

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*