हिमाचल प्रदेशात प्रत्येक घरात गॅसजोडणी; देशभरात ठरले पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची घोषणा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सर्व घरांमध्ये एलपीजी गॅस कनेक्शनची सुविधा उपलब्ध असलेले हिमाचल प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. चुलीच्या धुरापासून गृहिणींची मुक्तता हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करणारेही ते पहिलेच राज्य ठरले आहे.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिमाचल गृहिणी सुविधा योजनेच्या लाभार्थींशी बोलताना यासंबंधी घोषणा केली आहे. पारंपरिक चुलीसाठी लाकूड गोळा करणे आणि स्वयंपाक करणे त्रासदायक होते. महिलांच्या आरोग्यावरही विपरित प्रभाव पडत होता असे ठाकूर यांनी सांगितले.

हे सर्व मुद्दे लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या मागील कार्यकाळात उज्ज्वला योजनेस प्रारंभ करत ग्रामीण क्षेत्रातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. उज्ज्वला योजनेमुळे राज्यातील १ लाख ३७ हजार कुटुंबांना लाभ झाला आहे.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर देशातील कोटय़वधी लोकांनी स्वेच्छेने एलपीजी अनुदानाचा त्याग गेला आहे. उज्ज्वला योजनेचा लाभ घेता न आलेल्या कुटुंबांकरता राज्य सरकारने हिमाचल गृहिणी सुविधा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत २,७६२४३ कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन प्रदान करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गॅस कनेक्शनमुळे महिलांना धूरापासून मुक्ती मिळाली तसेच पर्यावरण संरक्षणाला हातभार लागला आहे. कोरोना महामारीने आमच्या संवादाच्या पद्धतींना बदलले आहे. अन्य राज्यांमधून आलेल्या होम क्वारंटाईनमधील लोकांवर नजर ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी महिलांना केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था