जम्मू-काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली आहे. 18 महिन्यानंतर राज्यात 4 जी इंटरनेट सर्व्हिस पुन्हा सुरू करण्यात आली. जम्मू-कश्मीरच्या पावर अँड इन्फॉर्मेशनचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी या विषयीची शुक्रवारी माहिती दिली.
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली आहे. 18 महिन्यानंतर राज्यात 4 जी इंटरनेट सर्व्हिस पुन्हा सुरू करण्यात आली. जम्मू-कश्मीरच्या पावर अँड इन्फॉर्मेशनचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी या विषयीची शुक्रवारी माहिती दिली.
High speed internet service resumes in Jammu and Kashmir
हायस्पीड इंटरनेट सेवा बहाल झाल्यानंतर जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ‘4 जी मुबारक! ऑगस्ट 2019 नंतर पहिल्यांदा संपूर्ण खोऱ्यात 4 जी मोबाइल डेटा सर्व्हिस बहाल करण्यात आली. देर आऐ दुरुस्त आये.’
उधमपूर आणि गांदरबल वगळता इतर जिल्ह्यांमध्ये 2 जी सेवा होती. जम्मू-कश्मीरमध्ये ऑगस्ट 2019 मध्ये विशेष राज्याचा दर्जा परत घेण्यापूर्वीपासूनच हायस्पीड इंटरनेट सर्व्हिस बंद करण्यात आली होती. 5 ऑगस्ट 2019 ला राज्याला युनियन टेरेटरीचा दर्जा देण्यात आला होता. राज्यामध्ये 2 जी इंटरनेट सर्व्हिस 25 जानेवारी 2020 ला बहाल करण्यात आली होती. 16 ऑगस्ट 2020 ला उधमपूर आणि गांदरबलमध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा ट्रायल बेसवर सुरू करण्यात आली होती. इतर जिल्ह्यांमध्ये 2 जी इंटरनेट सेवा जारी करण्यात आली होती.
सुरक्षा दलांना वाटत होते की देशद्रोही शक्ती आर्टिकल 370 हटवल्यानंतर दुष्प्रचार करतील आणि इंटरनेटमुळे त्यांना मदत होईल. यामुळे 4 जी मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्या दरम्यान राज्याचे अनेक राजकीय दल आणि फुटीरतावादी नेत्यांनाही नजरबंद करण्यात आले होते.