मुंबईत हायप्रोफाईल लव्ह जिहादचा प्रकार उघड, मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी अभिनेत्रीला पतीकडून मारहाण


मुळ नाव लपवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्न झाल्यानंतर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणायचा असे लव्ह जिहादचे आदर्श उदाहरण मुंबईत उघड झाले आहे. टीव्ही अभिनेत्री प्रती तलरेजाबाबत हा प्रकार घडला आहे. पोलीसांनी दखल घेतली नसल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पंतप्रधान कार्यालयाला सोशल मीडियावर टॅग करून तिने आपली आपबीती सांगितले आहे. High profile love jihad type revealed in Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुळ नाव लपवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्न झाल्यानंतर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणायचा असे लव्ह जिहादचे आदर्श उदाहरण मुंबईत उघड झाले आहे. टीव्ही अभिनेत्री प्रती तलरेजाबाबत हा प्रकार घडला आहे. पोलीसांनी दखल घेतली नसल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पंतप्रधान कार्यालयाला सोशल मीडियावर टॅग करून तिने आपली आपबीती सांगितले आहे. High profile love jihad type revealed in Mumbai

टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री प्रीती तलरेजाने तिचा नवरा अभिजीत पेटकर याच्याविरूद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. प्रीतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे.प्रीतीने सांगितल्यानुसार, ती सुरुवातीला मुंबई पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोहोचली होती, परंतु त्यांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पीएमओला सोशल मीडियावर टॅग करुन आपली आपबीती सांगितली. त्यानंतर खडकपाडा वेलफेअर पोलिसांनी प्रीतीच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रीतीने तीन वर्षांपूर्वी जिमचा मालक असलेल्या अभिजीत पेटकर याच्याशी लग्न केले. मागील काही दिवसांपासून प्रीती सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, पोलिस आणि इतरांकडून मदत मागत आहे. प्रीतीने आपल्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार, तिचा नवरा अभिजीत पेटकर मुस्लिम आहे. दोघांनीही मशिदीत लग्न केले होते. मुस्लिम असूनही तिचा नवरा लीगल डॉक्युमेंटवरील अभिजीत पेटकर या नावाचा वापर करतो. मुस्लिम कायद्यानुसार त्याला मशिदीकडून प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. आता अभिजीत प्रीतीवर धर्म बदलण्याचा दबाव आणत असून तिला सतत मारहाण करतोय.

High profile love jihad type revealed in Mumbai

प्रीतीने सोशल मीडियावर तिच्यासोबत झालेल्या मारहाणीचा व्हिडिओदेखील शेअर केला. प्रीतीची सोशल मीडियावर बरीच छायाचित्रे आहेत. ज्यात तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा दिसत आहेत. एका पोस्टमध्ये प्रीतीने लिहिले की, तिचा नवरा अभिजीतने तिला मुस्लिम असल्याचे सांगितले होते.

पण धर्म परिवर्तनाची कोणतीही कागदपत्रे त्याच्याजवळ नाहीत. ती म्हणते, 3 वर्षांपासून प्रेमाच्या नावाखाली तो माझी फसवणूक करतोय. एखाद्या चांगल्या भविष्यासाठी एखाद्यावर प्रेम करणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे ही एक चूक आहे?, असा प्रश्न प्रीतीने उपस्थित केला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती