आसाममध्ये हिमंता यांचे अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन, काँग्रेस-युडीएफवर सडकून टीका


विशेष प्रतिनिधी

गुवाहटी – आसाममध्ये भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा नवा चेहरा अशी गणना होत असलेल्या हिमंता बिश्व शर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेस आणि अखिल भारतीय संयुक्त लोकशाही आघाडी (युडीएफ) यांची युती आसामच्या संस्कृतीला धोका असल्याचा दावा त्यांनी केला. Hemanta Biswa Sharma targets congress led front in Assam

भाजपची आसामसाठीची रणनीती आखण्यात त्यांचे मत प्रमाण मानण्यात आल्याचे राजकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. शर्मा यांनी सांगितले की, आपल्याला काँग्रेस- युडीएफ आघाडीचा पराभव करावा लागेल, जेणेकरून ते आसामची संस्कृती आणि मूल्यांचा कदापि विनाश करू करणार नाहीत. भाजप पुन्हा एकदा भव्य मताधिक्क्याने सरकार स्थापन करेल. विकास आणि आसामची ओळख हेच आमचे मुद्दे आहेत.सुधारित नागरिकत्व कायद्याशी (सीएए) भाजप आसाममध्ये ठाम राहणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, हे तुम्ही आसामच्या जनतेलाच विचारा. इथे ओळख आणि विकास या मुद्द्यांवर निवडणूक होत आहे.

युडीएफची सूत्रे बद्रुद्दीन अजमल यांच्याकडे आहेत. त्यांना आसाममध्ये घुसखोरीला खतपाणी घातल्याचा आरोप केला जातो. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा अजमल यांनी वेळोवेळी नाकारली आहे.

Hemanta Biswa Sharma targets congress led front in Assam

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती