Hemant Nagrale Replaces Parambir Singh as new Commissioner of Mumbai Police says HM Anil Deshmukh

सचिन वाझे प्रकरणामुळे परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, हेमंत नगराळेंना मुंबईची जबाबदारी

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 58 वर्षीय नगराळे हे 1987च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अद्याप महासंचालक (तांत्रिक आणि कायदेशीर) म्हणून काम करत होते. Hemant Nagrale Replaces Parambir Singh as new Commissioner of Mumbai Police says HM Anil Deshmukh


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 58 वर्षीय नगराळे हे 1987च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अद्याप महासंचालक (तांत्रिक आणि कायदेशीर) म्हणून काम करत होते.

तथापि, परमबीर सिंग यांची अचानकपणे होणारी बदली अँटिलिया प्रकरणाशी जोडली जात आहे. पोलिस आयुक्त असलेले परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकू येत होती. परमबीर सिंग यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या बरोबरच रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलिस पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची दबाबदारी देण्यात आली आहे.

Hemant Nagrale Replaces Parambir Singh as new Commissioner of Mumbai Police says HM Anil Deshmukh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*