सो कॉल्ड पर्यावरण’प्रेमी कुटुंबियांनी जंगलातील जमीनीवर बंगला बांधला आहे का? अमृता फडणवीस यांचा ठाकरे परिवाराला सवाल


‘सो कॉल्ड पर्यावरण’प्रेमी कुटुंबियांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? ‘वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार’, असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. Have so called eco-friendly families built bungalows on forest land?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘सो कॉल्ड पर्यावरण’प्रेमी कुटुंबियांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? ‘वाह वाह, सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार,’ असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे.

आरेतील जंगल वाचवण्यासाठी मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.उद्धव ठाकरे यांनी अलिबागमध्ये वन जमिनीच्या हद्दीत बंगला बांधल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला आहे. कोर्लाई (अलिबाग) येथील या जमिनीचा काही भाग जंगलाच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे याठिकाणी बंगला बांधताना ठाकरे परिवाराने परवानगी घेतलीच असेल, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले होते.

किरीट सोमय्यांच्या या ट्विटला अमृता यांनी रिट्विट करत त्यावर विशेष टिप्पणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबाग येथील पाच कोटींची संपत्ती लपवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याविरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे 5 कोटीची संपत्ती आहे. ही माहिती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली नाही. ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले होते.

Have so called eco-friendly families built bungalows on forest land?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था