शिवसेनेच्या केवळ वल्गना; हरियाणात भूमिपुत्रांसाठी आरक्षण देऊन दाखवलं


  • प्रत्येक खासगी कंपन्यांमध्ये भूमिपुत्रांसाठी ७५ टक्के आरक्षण

विशेष प्रतिनिधी 

चंदीगड : स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेला गेल्या वर्षभरात जमले नाही पण हरियाणातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने करून दाखविले. खासगी कंपन्यांमध्ये भूमिपूत्रांना 75 टक्के आरक्षण असावे, अशा स्वरुपाचं विधेयक हरयाणा विधानसभेत मंजूर झाले आहे. haryana news

हरयाणा राज्यातील प्रत्येक खासगी कंपन्यांमध्ये भूमिपुत्रांसाठी 75 टक्के आरक्षण असणार आहे. हा कायदा न मानणाºया खासगी कंपन्यांना दंड आकरला जाणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या वल्गना करत शिवसेनेने स्थापनेपासून आपले राजकारण केले.haryana news

मात्र, सत्तेवर येऊनही एक वर्ष होत आले तरी शिवसेनेने या मुद्याला साधा स्पर्शही केला नाही. मात्र, हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन हे विधेयक मंजूर केले.

haryana news

हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले, हरयाणाच्या लाखो तरुणांना आम्ही दिलेलं वचन आज पूर्ण केलं आहे. आता राज्यातील सर्व खासगी कंपन्यांमध्ये राज्याचे 75 टक्के तरुण नोकरी करतील. सरकार स्थापन झाल्यानंतर अगदी वर्षभरात आलेले हे क्षण भावूक करणारे आहेत.

हरयाणाच्या जननायक जनता दलने विधानसभा निवडणुकीवेळी खासगी कंपन्यांमध्ये भूमिपुत्रांसाठी 75 टक्के आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं होतं.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था