हरियाणा सरकारने रब्बी हंगामातील २९,९५० कोटींची एमएसपी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली; मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरांची माहिती

वृत्तसंस्था

चंडीगड – हरियाणातील भाजप सरकारने यंदाच्या रब्बी हंगामातील पीक खरेदीची २९,९५० कोटी रूपयांची एमएसपी रक्कम दिल्याची आणि खरेदीतील अन्य घटकांना १८०० कोटी रुपये दिल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे. Haryana govt paid about Rs. 29,950 cr to farmers as MSP in procurement ops of 2020-21

हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या मोबदल्याची रक्कम ती खरेदी लगेच अदा करावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले होते. ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर पंजाब आणि हरियाणातील आडत्यांनी या केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता.

पण हरियाणा सरकारने केंद्राच्या आदेशानुसार २९,९५० कोटी रुपये एवढी रक्कम एमएसपीच्या रूपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. हरियाणा सरकारने शेतकऱ्यांकडून ८१ लाख मेट्रीक टन गहू, ७ लाख मेट्रीक टन मोहरी आणि ७ लाख मेट्रीक टन तांदूळ खेरेदी केला आहे.

पीक काढणीनंतर धांदोट्या व्यवस्थापनासाठी सरकारने १००४२ यंत्रे सबसिडी रकमेत दिली होती. १३४५ केंद्रे उघडली होती. त्यामुळे पीकांचे अवशेष, धांदोटे शेतातच जाळण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे प्रदूषणही कमी झाले, असे मुख्यमंत्री खट्टर यांनी स्पष्ट केले.

Haryana govt paid about Rs. 29,950 cr to farmers as MSP in procurement ops of 2020-21

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*