Happy birthday Smriti Irani: पंतप्रधान मोदींनी स्मृती इराणी यांना दिल्या खास शुभेच्छा ; @45 ‘ तुलसी ते अमेठी ‘ सुंदर प्रवास

  • 2019 मध्ये अमेठी येथून राहुल गांधींच्या विरोधात झालेल्या निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसचा गड उद्ध्वस्त करून राहुल गांधींना आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत केले होते.

  • मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात स्मृती इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. मे 2019 मध्ये महिला व बाल विकास मंत्री म्हणून त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: मोदी सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणार्या स्मृती इराणी आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. क्योंकी सास भी कभी बहू थी! मधून घराघरात पोहचलेल्या तुलसीने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तसचं त्यांनी राजकारणात देखील धडाकेबाज परफॉरमंस दिला आणि अमेठीतील घरानेशाही वर थेट वार करत राहुल गांधींचा पराभव केला.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा,भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी त्यांना अभिनंदनपर संदेश पाठवले आहेत. स्मृती इराणी यांच्या कार्याचे कौतुक करत पंतप्रधान मोदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

पीएम मोदी यांनी ट्विट केले आहे की, “केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महत्त्वपूर्ण वस्त्रोद्योग मंत्रालयाची प्रगती करण्यासाठी आणि महिला सबलीकरणासाठी त्या उल्लेखनीय प्रयत्न करत आहेत. आम्ही सर्व त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो ”

अमित शहा यांनी काय लिहिले?

अमित शहा यांनी लिहिले, “केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” आपल्या देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी कार्य करत रहावे. आम्ही त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो. ”

 

विजया रहाटकर यांनी देखील छानसे ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वो शक्ती है, सशक्त है
वो भारत की नारी है
प्रभु श्रीराम आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.

 

राजकारणात येण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी मॉडेलिंग आणि टेलिव्हिजन या जगातही काम केले आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात स्मृती इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. मे 2019 मध्ये महिला व बाल विकास मंत्री म्हणून त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्याच वेळी, त्या 2014 मध्ये मानव संसाधन विकास मंत्री होत्या.

राजकीय प्रवास

2010 मध्ये स्मृती भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि महिला विंगच्या अध्यक्षा झाल्या. 2019 मध्ये अमेठी येथून राहुल गांधींच्या विरोधात झालेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली. स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसचा गड उद्ध्वस्त करून राहुल गांधींना आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत केले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*