रस्त्याकडेच्या धार्मिक स्थळावर हातोडा , उत्तरप्रदेश सरकारचा निर्णय ; 2011 पासूनची सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश

वृत्तसंस्था

लखनौ : रस्त्याकडेला 2011 पासून असलेली धार्मिक स्थळे तातडीने हटविण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. प्रशासन अधिकारी आणि पोलिसांनी याबाबत उचित कारवाई करावी, असे आदेशात नमूद केले आहे. Hammer on religious roadside, decision of Uttar Pradesh government; Order to demolish all constructions since 2011

राज्याच्या गृहविभागाने दिलेल्या आदेशात म्हंटले आहे की, सार्वजनिक रस्त्याकडेला 1 जानेवारी 2011 पासून असलेले कोणतेही धार्मिक स्थळ तातडीने हटवावे. सार्वजनिक रस्ते, महामार्ग येथे आक्रमण करून बांधलेले धार्मिक स्थळ अथवा बेकायदा बांधकाम सहा महिन्यात पाडून टाका.उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई केली जात आहे. त्यात अडथळे आणले तर तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Hammer on religious roadside, decision of Uttar Pradesh government; Order to demolish all constructions since 2011

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*