मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यावर हमीद अन्सारी चिडले; पण मुलाखतीच्या शेवटी काय कबूल करून बसले?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मॉब लिंचिंगवर प्रश्न विचारताच माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी चिडले. पण मुलाखतीच्या शेवटी मॉब लिंचिंगचा धर्माशी काही संबंध नसल्याचे कबूल करून बसले… हा प्रसंग घडला झी न्यूजच्या मुलाखती दरम्यान. अन्सारींचे हॅपी अँक्सिडेंट हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात मॉब लिंचिंगपासून बहुसंख्याकवादापर्यंत अनेक दावे – प्रतिदावे आणि वादग्रस्त विधाने करण्यात आली आहेत. Hamid Ansari was angry when asked about mob lynching

या वादग्रस्त विधानांवरून अन्सारी यांची मुलाखत झी न्यूजने घेतली. त्यावेळी अँकरने अन्सारींना मुसलमान देशात असुरक्षित कसे असा प्रश्न विचारला… त्यावर अन्सारींनी मॉब लिंचिंगचे उदाहरण दिले. त्यावर अँकरने बंगाल आणि केरळमध्ये हिंदूंचे मॉब लिंचिंग झाल्याची उदाहरणे नावांसकट दिल्यावर अन्सारी चिडचिडे झाले. मी म्हणतोय, मुसलमान अस्वस्थ आहेत म्हणजे आहेत, असे विधान केले. पण अँकरने त्याचे पुरावे मागताच ते त्याच्यावर आणखी चिडले. तुमचा माइंडसेटच खराब आहे. तुम्ही माझ्या पुस्तकाचे परीक्षण करा. वगैरे बोलू लागले… पण अँकर पुरावे मागू लागताच… तुम्ही इथे आलातच का… मी काय तुम्हाला निमंत्रण दिले होते का… वगैरे विधाने अन्सारींनी केली. पण त्यांनी अँकरच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.


हमीद अन्सारींच्या पुस्तकात मोदींवर गंभीर आरोप; मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना राजकीय हेतूंनी प्रसिध्दी दिली नसल्याचा दावा


अँकर ठाम राहून प्रश्न विचारत गेल्यावर मात्र, अन्सारींना बोलणे भाग पडले. मॉब लिंचिंगमध्ये धर्म कसा काय येतो… मुसलमान असुरक्षित आहेत… आपण अलिगड विद्यापीठाचे उपकुलगुरूपद भूषविले, संयुक्त राष्ट्र संघात पर्मनंट प्रतिनिधी होतात. दोनदा उपराष्ट्रपती झालात… तेव्हा आपण मुसलमानांच्या असुरक्षिततेविषयी भाष्य केले नाही… पण कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी मुसलमान असुरक्षित असल्याचे विधान केलेत. त्याचे पुरावे काय, असा सवाल अन्सारींना जोरात टोचला. त्यातून हा वादप्रसंग घडला.

पण मुलाखतीच्या अखेरीस अन्सारींना मॉब लिंचिंगमध्ये धर्माचा संबंध नाही तर कायदा सुव्यवस्थेचा संबंध आहे आणि असुरक्षिततेची भावना असलीच तर सर्व समाजात आहे… अशी कृबुली द्यावी लागली.

Hamid Ansari was angry when asked about mob lynching

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था