गुपकार गठबंधनमध्ये पडू लागली फूट, आघाडीचे औचित्यच काय असा केला जाऊ लागला सवाल


जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बनलेल्या गुपकार गठबंधनमध्ये महिन्याच्या आतच फूट पडू लागली आहे. या आघाडीचे औचित्यच काय, असा सवाल केला जाऊ लागला आहे. गुपकार आघाडी म्हणजे आणखी एक हुर्रियत कॉन्फरन्स बनेल अशी भीती एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. gupar group secret alliance began to fall apart


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बनलेल्या गुपकार गठबंधनमध्ये महिन्याच्या आतच फूट पडू लागली आहे. या आघाडीचे औचित्यच काय, असा सवाल केला जाऊ लागला आहे. गुपकार आघाडी म्हणजे आणखी एक हुर्रियत कॉन्फरन्स बनेल अशी भीती एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. gupar group secret alliance began to fall apartपाकिस्तानातून कलम ३७० हटविल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी यांनी एकत्र येऊन गुपकार आघाडीची स्थापना केली होती. जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकाही या आघाडीने एकत्र येऊन लढविल्या. मात्र, तरीही भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यामुळेच आता या आघाडीचे औचित्य काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बशारत बुखारी यांनी आघाडीच्या कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की निवडणुकांनंतर आता आघाडीला आपली पुढील दिशा ठरवावी लागणार आहे. अन्यथा गुपकार आघाडी म्हणजे आणखी एक हुर्रियत कॉन्फरन्स बनेल. गुपकार आघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने अमित शहा यांची भेटही घेतली. अपनी पार्टीचेचे अध्यक्ष आणि कश्मीरी नेते अल्ताफ बुखारी यांनी आयोजित केलेल्या एका भोजनसमारंभात ही भेट झाली.

फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स, महबूबा मुफ्ती यांची पीडीपी, सज्जाद लोन यांची पिपल्स कॉन्फरन्स आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची पिपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन यांनी मिळून जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका लढविल्या होत्या. मात्र, त्यांना २८० जागांपैैकी केवळ ११० जागा मिळाल्या. यामुळे गुपकार आघाडीत मतभेद सुरू झाले आहे. कोणी कोणाचे उमेदवार पाडले अशी चर्चा सुरू आहे.

gupar group secret alliance began to fall apart

पीडीपीने जाणून बुजून आमच्या उमेदवारांविरोधात अनधिकृत उमेदवार उभे केले असा आरोप नॅशनल कॉन्फरन्सने केला आहे. या अनधिकृत उमेदवारांत पीडीपीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सफीना बेग आणि पक्षाचे महासचिव नासिर अहमद खान यांचाही समावेश होता. त्यामुळे या संशयाला बळकटी आली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती