भाजप राज्य कमिटी सदस्याच्या कारवर बंगालमध्ये गोळीबार

कृष्णेंदू मुखर्जी यांच्या कारवर टीएमसीच्या गुंडांनी बर्द्धमान जिल्ह्यातील आसनसोल येथे गोळ्या झाडल्या आहेत, असा आरोप सोमवारी करण्यात आला. Gun shots fired at Krishnendu Mukherjee vehicle in West Bengal


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या भाजप राज्य कमिटीचे सदस्य कृष्णेंदू मुखर्जी यांच्या कारवर टीएमसीच्या गुंडांनी बर्द्धमान जिल्ह्यातील आसनसोल येथे गोळ्या झाडल्या आहेत, असा आरोप सोमवारी करण्यात आला.

परंतु हल्लेखोर वाहनचे दरवाजे उघडण्यात अयशस्वी झाल्याने ते वाचले. राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने मात्र हा आरोप फेटाळून लावला. मुखर्जींच्या जुन्या प्रतिस्पर्ध्यांनी हा हल्ला केल्याचे म्हटले आहे.रविवारी रात्री कोलकताहून मी आसनसोलच्या हीरापुरात घरी परत जात असताना, तीन अज्ञात व्यक्तींनी माझी गाडी माझ्या घराजवळ थांबवली आणि दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो उघडला नाही. त्यानंतर त्यांनी कारवर अंदाधुंद गोळीबार केला. ते तृणमूल काँग्रेसचे गुंड असावेत, असा माझा संशय आहे.

ड्रायव्हरने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि स्थानिकांचे लक्ष वेधण्यासाठी मी वारंवार हॉर्न वाजविला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले, ‘असे मुखर्जी म्हणाले. या घटनेमागे टीएमसीचा हात असल्याचा त्यांनी आरोप केला असून त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना घटनेची माहिती दिली आहे.

Gun shots fired at Krishnendu Mukherjee vehicle in West Bengal

नड्डा यांच्या कारवर झाला होता हल्ला
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मोटारीच्या ताफ्यावर महिन्यांपूर्वी असाच हल्ला झाला होता. त्यामागे तृणमूल काँग्रेसचे गुंड होते. असे तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर हा नवा हल्ला झाल्याने भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*