गुजरातमध्ये ‘आप’चा नुसताच फुगा; तीन महापालिकांत 100 टक्के, दोन ठिकाणी 90 टक्के, तर सुरतमध्येही 52 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट गुल

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरातमधील सुरत शहरात आम आदमी पक्षाने २७ जागा जिंकल्याने गुजरात विजयाच्या वल्गना केल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात गुजराती जनतेने आपला पूर्णपणे नाकारले असल्याचे आकडेवारीहून स्पष्ट होत आहे. अहमदाबाद, वडोदरा आणि भावनगर या तीन महापालिकांत आपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. सुरत वगळता इतरत्र पक्षाच्या ९० टक्के उमेदवारांना डिपॉझिट गमवावे लागले आहे. Gujarat completely rejected AAP, 90 percent candidates deposits fortified

आम आदमी पक्षाची तुलनेने चांगली कामगिरी सुरतमध्ये आहे. सुरतमधील १२० जागांपैकी केवळ ११३ ठिकाणीच आपला उमेदवार मिळाले. त्यापैकी २७ उमेदवार विजयी झाले. आपला येथे २८.४७ टक्के मते मिळाली आहेत.
अहमदाबाद शहरातील १९२ जागांपैकी केवळ १५५ जागांवर आपने उमेदवार उभे केले होते. आप ला येथे ६.९९ टक्के मते मिळाली. मात्र, सर्वच्या सर्व १५५ उमेदवारांचे डिपॉझिट गमाविण्याची नामुष्की पत्करावी लागली. वडोदरा महापालिकेत तर आपने ७६ पैकी ४१ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. येथे त्यांना केवळ २.८१ टक्के मते मिळाली आहे. वडोदºयातही आपचा एकही उमेदवार आपले डिपॉझिट राखू शकला नाही. भावनगर महपालिकेत आपला केवळ ६.१७ टक्के मते मिळाली. ५२ जागांपैकी ३९ ठिकाणी आपने उमेदवार उभे केले होते. त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले.राजकोट महापालिकेतही आपला एकही जागा मिळविता आली नाही. आपसाठी त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे ७२ च्या ७२ जागांवर उमेदवार उभे करणे शक्य झाले. त्यातील चार जणांनी आपले डिपॉझिटही राखले. मात्र, ६८ जणांना डिपॉझिट गमवावे लागले.

जामनगर महापालिकेतही आपला सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणे शक्य झाले. ६४ पैकी ४८ जागांवर आपचे उमेदवार होते. केवळ ८.४१ टक्के मते ते मिळवू शकले. यातही ४४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
निवडून आलेल्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा एक दशांश मते मिळाली तर निवडणूक अर्ज भरताना भरलेले डिपॉझिट उमेदवारांना परत मिळते. अन्यथा त्याचे डिपॉझिट जप्त होते. आपच्या बहुतांश उमेदवारांना आपले डिपॉझिट राखता आलेले नाही.

आपचे सुरतमध्ये निवडून आलेले बहुतांश उमेदवार हे इतर पक्षांतील नाराज आहेत. त्यांच्या स्वत:च्या ताकदीवर ते निवडून आले असल्याचेही दिसून आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री या यशाने हुरळून जाऊन रोड शो करणार आहेत का असा उपरोधिक सवाल गुजरात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी केला आहे.

Gujarat completely rejected AAP, 90 percent candidates deposits fortified

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*