ग्रेटाने सर्वांसमोर आणलेले टूलकिट तयार केली खलिस्तान समर्थक संघटनांनी!!, त्याचा अर्थ काय? आणि हेतू काय?

टूलकिट म्हणजे काय?

 • साधनसूची / प्रचार साहित्य / संदर्भ पुस्तिका
 • टूलकिट आणि शेतकरी आंदोलनाचा संबंध काय?
  -शेतकरी आंदोलन जगभर पोहचवण्याच्या संदर्भ पुस्तिकेला टूलकिट म्हटले गेले आहे.
 • टूलकिट वापरून काय करायचे आहे?
  -टूलकिटद्वारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा गोळा केला जातोय.
 • टूलकिट कुणी सर्वांसमोर आणले?
  -ग्रेटा थनबर्गने
 • ग्रेटा थनबर्गवर भारतात गुन्हा दाखल झालाय का?
  -होय.
 • टूलकिट कुणी बनवले आहे?
  -पोएटिक जस्टीस फाउंडेशनने हे बनवले आहे.
 • पोएटिक जस्टीस फाउंडेशन काय आहे?
  -पोएटिक जस्टीस फाउंडेशन कॅनडास्थित प्रचार-प्रसारासाठी कार्यरत विदेशी गट आहे.
 • पोएटिक जस्टीस फाउंडेशनने खलिस्तान चळवळीला पाठिंबा दिला आहे का?
  -होय. तसे त्यांनीच सांगितले आहे.
 • पोएटिक जस्टीस फाउंडेशन आणि सध्याच्या शेतकरी आंदोलनाचा संबंध आहे का?
  -होय. ते सध्याच्या शेतकरी आंदोलनासाठी सक्रिय असल्याचे त्यांनीच स्पष्टपणे सांगितले आहे.
 • पोएटिक जस्टीस फाउंडेशनच्या करवायांबाबत राकेश टिकैतसह शेतकरी आंदोलक नेत्यांना ठाऊक आहे का?
  -होय. २३ जानेवारी पूर्वी त्यांना तशी कल्पना दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
 • खलिस्तानवादी पोएटिक जस्टीस फाउंडेशनने ठरवल्याप्रमाणे शेतकरी आंदोलनाबाबत घडले का?
  -होय. तसे घडत आहे.
 • पोएटिक जस्टीस फाउंडेशनकडून २६ जानेवारी २१च्या हिंसाचाराबाबत सूचक वक्तव्य झाले होते का?
  -होय.
 • पोएटिक जस्टीस फाउंडेशनने जगभरातून चर्चित चेहऱ्यांना ट्विट करायला उद्युक्त केले असेल का?
  -होय. तसे त्यांच्या कार्यप्रणालीत म्हटले आहे व समाजमाध्यमात तसे दिसत आहे.
 • पोएटिक जस्टीस फाउंडेशनच्या टूलकिटमध्ये भारतविरोधी काय आहे?
  -भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन त्यात आहे.
 • पोएटिक जस्टीस फाउंडेशनचा पाठिंबा घेऊन आंदोलन चालवणारे भारताची प्रतिमा डागाळण्याच्या प्रयत्नाला अप्रत्यक्ष हातभार लावत आहेत का?
  -होय.

greta thunburg toolkeet made by khalistani forces

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*