इंटेलिजेंट’ रहदारी कार्य तत्पर गडकरी : Green Express Highways वर केंद्र सरकार 7 लाख कोटी खर्च करणार, नितीन गडकरींचं सॉलिड प्लॅनिंग ; दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे एक वर्षात पूर्ण

  • Highways वर केंद्र सरकार 7 लाख कोटी खर्च करणार, नितीन गडकरींचं सॉलिड प्लॅनिंग ; दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे एक वर्षात पूर्ण

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या (Green Express Highways) बांधकामावर सरकार सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहे. Green Express The central government will spend Rs 7 lakh crore on highways says Nitin Gadkari

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या (Green Express Highways) बांधकामावर सरकार सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व अभियांत्रिकीच्या माध्यमातून हे महामार्ग तयार करण्यात येत आहेत . यामुळे रहदारी ‘इंटेलिजेंट’ होईल आणि त्याच वेळी पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित केले जाईल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने डिजिटल पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, या Green Express Highways मुळे देशातील परिवहन अधिक स्मार्ट होईल. त्याचबरोबर प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. एक लाख कोटी रुपये खर्च करुन दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे पुढील एक वर्षात पूर्ण होईल. त्याचबरोबर दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेचे उद्घाटन एक-दोन महिन्यांत होईल.

नॅशनल रोड अँड हायवे समिटमध्ये गडकरी म्हणाले की, आम्ही ग्रीन हायवेच्या बांधकामावर सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहोत. यामुळे देशातील वायू प्रदूषण कमी होण्यास, रहदारी सुलभ होण्यास आणि लॉजिस्टिक्स तसेच वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल.

60 टक्के काम पूर्ण
गडकरी म्हणाले की, या 1,300 कि.मी. प्रकल्पातील 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम एका वर्षात पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ते म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठ लेन असतील. दुसर्‍या टप्प्यात त्यांची संख्या 12 होईल. त्याअंतर्गत स्वतंत्र इलेक्ट्रिक हायवे लेनही बांधली जाईल. ते म्हणाले की, एका वर्षात इलेक्ट्रिक ट्रकदेखील उपलब्ध होतील.

नितीन गडकरी म्हणाले की, दिल्ली-अमृतसर-कटरा प्रकल्पाचे काम दोन ते तीन महिन्यांत सुरू होईल. याशिवाय पाइपलाईनमधील 4,063 कोटी रुपयांचा दिल्ली-फरीदाबाद-सोहना एक्सप्रेस महामार्ग आणि अहमदाबाद-ढोलेरा महामार्ग प्रकल्प 4,000 कोटी रुपयांचा आहे, तोदेखील सादर करण्यात आला आहे.

Green Express The central government will spend Rs 7 lakh crore on highways says Nitin Gadkari

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*