पंतप्रधान मोदी यांनी परिधान केलेल्या जामनगरच्या पगडीचे मोठे कुतूहल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेली जामनगरची पगडी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तसेच पगडीबाबत चर्चाही होती. Great curiosity about the Jamnagar turban worn by Prime Minister Modi

राजपथावर 72 वा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित केला. त्यावेळी मोदी यांनी परिधान केलेल्या पगडीविषयी लोकांमध्ये कुतूहल वाढले होते. डोक्यावर पगडी, वाढवलेली पांढरी शुभ्र दाढी, फिकट राखट रंगाचे मोदी जॅकेट, पांढरा झब्बा , पायजमा आणि खांद्यावर शॉल या वेषभूषेत ते दिसले.पंतप्रधान मोदी हे वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा परिधान करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचे खादीचे जॅकेट जगभरात मोदी जॅकेट म्हणून प्रसिद्ध झाले होते. विशेष म्हणजे हे मोदी जॅकेट नंतर अनेक भारतीयांनी विशेष कार्यक्रमात एक महत्वपूर्ण पोशाख म्हणून परिधान करण्यास सुरुवात केली. हिवाळ्यात या जॅकेटला चांगलीच मागणी असते.

राष्ट्रीय कार्यक्रमात त्यांच्या अनोख्या वेशभूषेचे कौतुकही होते. आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी गुजरात राज्यातील जामनगरची पगडी परिधान केली होती. जामनगरच्या राजघराण्याने ही पगडी त्यांना प्रथमच भेट दिली होती. तीच त्यांनी आज परिधान केली.

Great curiosity about the Jamnagar turban worn by Prime Minister Modi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था