विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. आपले ज्या महिलेशी संबंध आहेत असं मुंडेंनी मान्य केलं होतं त्यांनीच तक्रार केली आहे.Grand welcome of Dhananjay Mundhe in Aurangabad ; traffic jam
आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी कोंडून ठेवल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. याआधी महिलेच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ उडाली होती.
असे असतांना औरंगाबादेत त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी क्रेनद्वारे पुष्पहार घालून त्यांचा जंगी सत्कार केला आणि हा सत्कार धनंजय मुंडे यांनी स्वीकारला. धनंजय मुंडे कोणताही विजय संपादन करून किंवा एखादी मोहीम फत्ते करून येत नव्हते. क्रेनद्वारे भला मोठा हार स्वीकारण्याएवढे कोणते कर्तृत्व गाजवले होते ? असा प्रश्न समाज माध्यमातून विचारला जात आहे .
मुंडे औरंगाबाद येथे पोहचले ती वेळ सायंकाळची, गर्दीची. मुख्य मार्गावर हा क्रेनद्वारे स्वागताचा कार्यक्रम चाललेला. त्यामूळे वाहतूक प्रचंड खोळंबली. सामान्य माणसाला यामुळे त्रास झाला . प्रशासन, कायदा सुव्यवस्था ,पोलीस यंत्रणा देखील राजकारणा पुढे हतबल झालेली दिसून आली.
धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; करूणा मुंडे यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Grand welcome of Dhananjay Mundhe in Aurangabad ; traffic jam
धनंजय मुंडे या ठिकाणी दाखल होताच त्यांना एक भव्य हार घालण्यात आला. या हाराचा आकार इतका मोठा होता, की तो घालण्यासाठी तिथं क्रेनचा वापर करण्यात आला. एखादी निवडणूक जिंकल्यानंतर ज्याप्रमाणे जल्लोष केला जातो अगदी तसाच जल्लोष औरंगाबादच्या चिखलठाण्यामध्ये मुंडे यांच्या येण्यानं पाहायला मिळाला. बीडहून इथं आले असता त्यांचं असं धमाकेदार स्वागत करण्यात आलं.