सरकारच्या दट्यानंतर ट्विटर नरमले, देशविरोधी ५०० ट्विटर अकाऊंट केली बंद

केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ट्विटर नरमले आहे. शेतकरी आंदोलनाबाबत विपर्यस्त माहिती पसरविणारी ५०० देशविरोधी ट्विटर अकाऊंटस बंद करण्यात आली आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ट्विटर नरमले आहे. शेतकरी आंदोलनाबाबत विपर्यस्त माहिती पसरविणारी ५०० देशविरोधी ट्विटर अकाऊंटस बंद करण्यात आली आहेत. government crackdown Twitter softened 500 anti-national Twitter accounts were shut down

याबाबत ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, सरकारच्या विनंतीनुसार ट्विटरने विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपायोजना केल्या आहेत. ट्विटरच्या नियमांचा भंग करणारी काही अकाऊंटस कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ट्विटरने स्फोटक आणि विपर्यस्त मजकूर असलेल्या काही हॅशटॅगवरही बंदी आणली आहे. काही अकाऊंटस देशाच्या सीमांमध्ये बंद केले आहेत. मात्र, ही अकाऊंटस इतर देशात सुरू असतील.ट्विटरने भारत सरकारला स्वत:हून या कारवाईची माहिती दिली. मात्र, वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्या, पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकारणी यांच्या अकाऊंटसवर कारवाई करण्यात येणार नाही असेही ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आमच्या वापरकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो असे ट्विटरने म्हटले आहे.

भारतविरोधी अपप्रचार करणारे अनेक ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी यादी देऊनही ट्विटर कंपनीनीने पाळली नव्हती.
भारत सरकारने ट्विटरला नोटीस दिली होती. त्यामध्ये बाराशे अकाऊंट बंद करण्यास सांगितले आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ही सर्व अकाऊंटस खलिस्थान आणि पाकिस्तान समर्थकांकडून चालविली जात आहेत. ही अकाऊंटस ऑटोमेटेड बॉटसवर आहेत. त्यांच्यामार्फत शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती पसरविली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला नोटीस देऊन २५७ अकाऊंटस बंद करण्याचे सांगितले होते. त्यामध्ये मोदीप्लॅनींगफार्मसजिनोसाईड असा हॅशटॅग वापरण्यात आला होता. भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा वंशसंहार करण्याची योजना आखत आहेत, असा त्याचा अर्थ होता. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ ए नुसार ही नोटीस देण्यात आली होती. मात्र, ट्विटरने यातील काही अकाऊंटस सुरूवातीला ब्लॉक करून नंतर अनब्लॉक केली. त्यामुळे ही अकाऊंटस सध्या सुरू आहेत.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्विटर कंपनीने जर सरकारच्या आदेशाचे पालन केले नाही तर त्यांना मोठे नुकसान सोसावे लागेल. कंपनीने भारत सरकारच्या विनंतीचा मान राखला नाही तर कोणताही निर्णय घेण्यास सरकार स्वतंत्र असेल. त्यामुळे सरकारने नवीन नोटीस दिली होती. भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सरकार ट्विटरची सेवा आपल्या सीमेमध्ये बाधितही करू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

government crackdown Twitter softened 500 anti-national Twitter accounts were shut down

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*