मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून सरकारच्या चार्टर विमानाचा उर्जामंत्र्यांकडून वापर; विश्वास पाठक यांच्या तक्रारीतील आणखी माहिती उघडकीस

वृत्तसंस्था

मुंबई : पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर कार प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझ यांना झालेली अटक आणि त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आलेले असताना आता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊतही अडचणीत आ लेले आहेत. याचं कारण आहे भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी राऊत यांच्या विरोधात आता मुंबईतील निर्मल नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. government charter aircraft by the energy minister, keeping the chief minister in the dark

एकीकडे राज्याची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी बेकायदा राज्य सरकारचं चार्टर्ड विमान वापरलं, असा आरोप पाठक यांनी केला आहे. हे विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. मात्र, ती राऊत यांनी घेतली नसल्याचा आरोप पाठक यांनी तक्रारीत केला.मागील वर्षी ऐन कोरोनाच्या काळात राज्य आर्थिक संकटातअसताना जुलैमध्ये राऊत यांनी दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई असा चार्टर्ड विमानाने प्रवास केला होता. हा सगळा प्रवास खासगी होता. यात सरकारी कामाचा सहभाग नव्हता, असाही आरोप पाठक यांनी तक्रारीत केला. दुसरीकडे राऊत यांनी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकून विमानाची ही बिलं भरायला लावली आहेत, असा आरोपही पाठक यांनी तक्ररीत केला.या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराला बगल देत राऊत यांनी परस्पर विमानाचा वापर केला आहे. तसंच बेकायदा सरकारी कंपन्यांना आपली बिलं भरायला लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आयपीसी 406, 409 कलमांच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पाठक यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी आता राऊत यांच्यावर कारवाई करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पाठक यांनी केली. अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई सुरुच ठेवू, असा इशारा पाठक यांनी दिला. एकीकडे वीज बिलं न भरल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज कापली जात आहे. पण, सरकारी पैशांचा अपव्यय करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई होणार का? असा सवाल पाठक यांनी विचारला आहे.

government charter aircraft by the energy minister, keeping the chief minister in the dark

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*