Good news Indian economy overcomes recession, 0.4 per cent growth In GDP

आनंदाची बातमी! भारतीय अर्थव्यवस्थेची मंदीवर मात, विकास दर 0.4 टक्क्यांनी वाढला

कोरोना साथीच्या दबावाखाली सलग दोन तिमाहींमध्ये मोठ्या घसरणीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने अखेर मंदीवर मात केली आहे. डिसेंबर तिमाहीत जीडीपीमध्ये 0.4 टक्के वाढ झाली आहे. सरकारने शुक्रवारी सांगितले की, अर्थव्यवस्था आता तांत्रिकदृष्ट्या मंदीच्या बाहेर गेली आहे. Good news Indian economy overcomes recession, 0.4 per cent growth In GDP


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या दबावाखाली सलग दोन तिमाहींमध्ये मोठ्या घसरणीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने अखेर मंदीवर मात केली आहे. डिसेंबर तिमाहीत जीडीपीमध्ये 0.4 टक्के वाढ झाली आहे. सरकारने शुक्रवारी सांगितले की, अर्थव्यवस्था आता तांत्रिकदृष्ट्या मंदीच्या बाहेर गेली आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहींत वाढीचा दर शून्यापेक्षा खाली आला होता. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा तांत्रिकदृष्ट्या फटका बसला होता.

तथापि, v आकारातील वेगवान सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेने तिसर्‍या तिमाहीतच मंदीला मागे टाकले. एप्रिल ते जून या तिमाहीत वाढीचा दर 23.9 टक्क्यांवर गेला असताना जुलै ते सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीतही 7.3 टक्क्यांची मोठी घसरण झाली होती.ऑक्टोबरपासून, औद्योगिक उलाढालीतील वेग, देशांतर्गत उत्पादनात वाढ आणि खप वाढल्याने तिसऱ्या तिमाहीत विकास दर 0.40 टक्क्यांवर आला. एनएसओने नोंदवले आहे की, 2020-21च्या तिसर्‍या तिमाहीत 3.3 टक्के विकास दर होता.

देशांतर्गत उत्पादनात 14 हजार कोटींची वाढ

एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) मूल्याच्या आधारे, 2020-21च्या तिसर्‍या तिमाहीत त्याचा आकार 36.22 लाख कोटींवर पोहोचला आहे, जो 2019-20च्या याच तिमाहीत 36.08 लाख कोटी होता. अशाप्रकारे देशांतर्गत उत्पादनात 14 हजार कोटींनी वाढ झाली आहे, जी 0.40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

चिंता अजूनही कायम

एनएसओने संपूर्ण आर्थिक वर्षात जीडीपीत होऊ शकणाऱ्या घसरणीचा अंदाज वर्तविला आहे. सरकारने जानेवारीत 7.7 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तविला होता, तो वाढवून 8 टक्के केला आहे. याचा अर्थ 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारात 8 टक्क्यांनी घट होईल. 2019-20 मध्ये भारताचा विकास दर 4 टक्के होता. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत चीनचा विकास दर 6.5 टक्के होती, जो पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 4.9 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.

Good news Indian economy overcomes recession, 0.4 per cent growth In GDP

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*