हवेत उडणारे सोनेरी बीटल पाहून लोक झाले चकित, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर यूजर्सना छोट्या कासवासारखे दिसणारे हे बीटल पाहून भलतेच आश्चर्य वाटत आहे. सोनेरी रंगाची ही छोटी छोटी कासवे लोकांच्या चांगलीच पसंतीला उतरत आहेत आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला व्हिडिओ Golden beetle flying in the air People were shocked to see the video went viral on social media


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सोशल मीडियावर यूजर्सना छोट्या कासवासारखे दिसणारे हे बीटल पाहून भलतेच आश्चर्य वाटत आहे. सोनेरी रंगाची ही छोटी छोटी कासवे लोकांच्या चांगलीच पसंतीला उतरत आहेत. सामान्यतः कासवे आकाराने बरीच मोठी असतात,

पण या व्हिडिओत दिसणाऱ्या कासवांसारख्या जिवांचा आकार फारच लहान आहे. हे खरेतर बीटल्स नावाचे किडे आहेत ज्यांचा रंग सोनेरी आहे आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला व्हिडिओ हा व्हिडिओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. यासोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘अनेकदा जे चमकते तेच सोने असते.’

हा बीटल दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळतो. लोकांनी गोल्डन टॉरटॉईज बीटल नावाच्या या जिवाला पहिल्यांदाच पाहिले आहे आणि हा कुठे आढळतो याबद्दलचे आणि इतरही तपशील जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

कसा असतो गोल्डन टॉरटॉईज बीटल?
हे चमत्कारिक गोल्डन टॉरटॉईज बीटल्स आकाराने छोटेच असतात. त्यांची लांबी 5 ते 7 सेंटीमीटर असते. त्यांच्या रंगातही वैविध्य आढळते. यापैकी काही बीटल्स लाल किंवा भुऱ्या रंगाचे असतात. त्यांच्या अंगावर काळे ठिपके असतात

तर काही बीटल्स या व्हिडिओत दिसणाऱ्या बीटल्ससारखे चमकदार सोनेरी रंगाचे असातत. यांना गोल्डबग म्हणजेच सोनेरी किडे या नावानेही ओळखले जाते. त्यांना हात लावल्यास त्यांचा रंगही काहीवेळा बदलतो.

गोल्डन आणि हवेत उडणाऱ्या या कासवांनी सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हैराण होत आहे. किंबहुना व्हिडीओ पाहिल्यानंतरही कुणाचा त्यावर विश्वास बसत नाही आहे.

व्हिडीओत पाहू शकता हे कासवं म्हणजे सोन्याचे असावेत असंच वाटतं. शिवाय जसे चमकणारे काजवे हवेत उडतात. अगदी तसेच हे सोनेरी कासवही हवेतही उडत आहेत.

Golden beetle flying in the air People were shocked to see the video went viral on social media

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*