गिरीश महाजनांना धमकी देणारा निघाला पाचोरा बस डेपोचा कंडक्टर

विशेष प्रतिनिधी

जळगावः नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजप जेष्ठ नेते गिरीष महाजन यांचे स्वियसहाय्यक दिपक तायडे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन येऊम चारी ही बाजूने बॉम्ब लावले असून पाच वाजेपर्यत एक कोटी पाठव अन्यथा बॉम्ब स्फोट करेल,अशी मोबाईलवरून धमकी देणाऱ्याला पकडले असून तो कंडक्टर आहे.

जामनेर येथील महाजन यांच्या जीएम फाऊंडेशनच्या ग्लोबल मल्टिस्पेशलटी हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आले होते. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी महाजनांच्या स्वियसहाय्यकाला एक अज्ञाताचा फोन आला. कार्यक्रम ठिकाणी बॉम्ब लावले असून एक कोटी रूपये दे नाहीतर बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी मोबाईलवर व टेक्स मॅसेजद्वारे दिली.

या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिस अधिक्षकांच्या सूचनेनुसार सायबर क्राईम व स्थानिक गुन्हे शाखेच्या व जामनेर पोलिस ठाण्याच्या पथकाने शोध लावत धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. धमकी देणारा व्यक्ती जामनेर तालुक्यातील पहुर येथील रहिवासी तर पाचोरा एसटी डेपो येथील बस कंडक्टर म्हणून कामाला आहे. जामनेर येथील गिरीष महाजन यांच्या हॉस्पीटलचे उद्घाटन फडणवीस यांच्याहस्ते मंगळवारी झाले. यावेळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी महाजन यांचे स्विससहाय्यक दिपक तायडे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन येऊन चारी ही बाजूने बॉम्ब लावले असून पाच वाजेपर्यत एक करोड पाठवण्याची धमकी दिली होती.

फिर्यादीनंतर पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी सायबर क्राईम,स्थानिक गुन्हे शाखा व जामनेर पोलिस स्टेशनचे असे तीन पथक नेमले होते. त्यानुसार पथकाने पाचोरा,पिंपळगाव हरेश्वर,पहुर परिसरात संशयितांचा शोध घेतला. लोकांशी केलेली विचारपूस तसेच तांत्रिक पध्दतीने शोध घेऊन आरोपी राजू देशमुख (वय,३२,पहुरपेठ,ता.जामनेर हा असल्याचे निष्पन्न जाले.

आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली असून अटकेवेळी त्यांच्याजवळ तेरा मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आरोपी पाचोरा डेपो येथे बस कंडक्टर म्हणून कामाला आहे. आरोपीला न्यायालयात आरोपीस हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपास करणाऱ्या पथकात जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळेसह इतर अधिकारी सहभागी होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*