गजनीचा मोह्ममद आणि मोह्ममद बिन कासीमचे कौतुक, गुन्हा दाखल झाल्यावर मागितली माफी

सोमनाथ मंदिरावर अठरा वेळा स्वाऱ्या करून त्याचा विध्वंस करणारा गजनीचा मोह्ममद आणि भारतात पहिल्यांदा इस्लाम आणणाऱ्या मोह्ममद बिन कासीम यांचे कौतुक करणाऱ्याने अखेर माफी मागितली आहे. पोलीसांत गुन्हा दाखल झाल्यावर त्याला ही उपरती झाली आहे.Ghazni’s Mohammad and Mohammad Bin Kasims appreciation, apologized when the crime was filed


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : सोमनाथ मंदिरावर अठरा वेळा स्वाऱ्या करून त्याचा विध्वंस करणारा गजनीचा मोह्ममद आणि भारतात पहिल्यांदा इस्लाम आणणाऱ्या मोह्ममद बिन कासीम यांचे कौतुक करणाºयाने अखेर माफी मागितली आहे. पोलीसांत गुन्हा दाखल झाल्यावर त्याला ही उपरती झाली आहे.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सोमनाथ मंदिराबाबच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. लूटमार करणाऱ्या महमूद गजनीचे आणि अरब राजा मोहम्मद बिन कासिमचे कौतुक केल्याप्रकरणी आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीवर प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती.गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर उभे राहून हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दोषी व्यक्तीनं महमूद गजनीने मंदिरांमध्ये केलेल्या लूटमारीच्या घटनांचा उल्लेख केला होता. याशिवाय बिन कासिमची प्रशंसासुद्धा केली होती.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आल्यानंतर सोमनाथ मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक विजयसिंह चवडा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गिर सोमनाथचे पोलिस अधिक्षक राहुल त्रिपाठी म्हणाले की, प्राथमिक तपासणीत हा व्हिडिओ बाहेरगावाहून सोमनाथ येथे आलेल्या एका व्यक्तीने काढला होता, असे उघडकीस आले आहे.

त्यानंतर यूट्यूबने आणखी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोषी व्यक्ती माफी मागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने म्हटले आहे की, मी ४ मे २०१९ रोजी गुजरातच्या सोमनाथ येथे फिरायला गेलो होतो.

तिथे आम्ही एक छोटा व्हिडिओ शूट केला ज्यात सोमनाथांची स्तुती करण्याच्या प्रयत्न केला जात होता. तथापि, या व्हिडिओमुळे कोणत्याही भारतीयांसह गुजराती बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

Ghazni’s Mohammad and Mohammad Bin Kasims appreciation, apologized when the crime was filed

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*