खुशखबर ! 31 जानेवारीपर्यंत मोफत गॅस सिलिंडर मिळवण्याची संधी, जाणून घ्या ऑफर…

get free LPG gas cylinders till January 31, Know About the offer

या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला एलपीजी सिलिंडर विनामूल्य मिळण्याची संधी आहे. या विशेष ऑफरअंतर्गत, गॅस सिलिंडरसाठी तुम्ही जेवढे पैसे खर्च कराल, तेवढे तुम्हाला परत पाठवले जातील. ही ऑफर पेटीएमने त्यांच्या मोबाइल वॉलेट प्लॅटफॉर्मवर दिली आहे. get free LPG gas cylinders till January 31, Know About the offer


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला एलपीजी सिलिंडर विनामूल्य मिळण्याची संधी आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही बुक केलेल्या सिलिंडरचे संपूर्ण पैसे परत मिळणार आहेत.

काय आहे ऑफर?
या विशेष ऑफरअंतर्गत, गॅस सिलिंडरसाठी तुम्ही जेवढे पैसे खर्च कराल, तेवढे तुम्हाला परत पाठवले जातील. ही ऑफर पेटीएमने त्यांच्या मोबाइल वॉलेट प्लॅटफॉर्मवर दिली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना केवळ एकदाच पेटीएमद्वारे गॅस सिलिंडर बुक करावे लागेल. पेटीएमची ही ऑफर सर्व कंपन्यांच्या गॅस कनेक्शनवर उपलब्ध असेल. या ऑफरचा फायदा फक्त त्यांनाच देण्यात येईल, जे पहिल्यांदा पेटीएमवरून गॅस सिलिंडर बुक करणार आहेत.ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये पेटीएम अॅप असणे गरजेचे आहे. ते नसल्यास प्रथम आपल्या मोबाइलमध्ये पेटीएम डाउनलोड करा. ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पेटीएमवर गॅस सिलिंडर बुक करावे लागेल. जर तुम्ही पेटीएमवरून तुमचे एलपीजी गॅस सिलिंडर बुक केले, तर तुम्हाला प्रचंड कॅशबॅक मिळू शकेल. यानंतर तुम्हाला 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. म्हणजेच आपण सिलिंडरसाठी दिलेली रक्कम कॅशबॅकच्या स्वरूपात परत केली जाईल. पेटीएमने प्रथमच गॅस सिलिंडर बुकिंगवर अशी ऑफर आणली आहे.

get free LPG gas cylinders till January 31, Know About the offer

अशी आहे अट…
तुमची बुकिंगची रक्कम 500 रुपये किंवा त्याहून अधिक असेल तरच ही पेटीएम ऑफर लागू असेल. ही ऑफर फक्त 31 जानेवारीपर्यंत लागू करण्यात आली आहे. तुम्ही रक्कम अदा केल्यावर एक स्क्रॅच कूपन मिळेल. बुकिंगच्या 24 तासांत तुम्हाला हे कूपन मिळेल. हे कूपन 7 दिवसांच्या तुम्हाला स्क्रॅच करावे लागेल. यानंतर तुमच्या खात्यात कॅशबॅक येईल.

get free LPG gas cylinders till January 31, Know About the offer

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती