एकाच व्यासपीठावर दीड तास पण एकमेंकांशी एक शब्द बोलले नाहीत गेहलोत आणि पायलट

राजस्थानात कॉंग्रेसच्या अडचणी अद्यापही संपल्या नसल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातून विस्तवही जात नाही. जयपूरमध्ये एकाच व्यासपीठावर दीड तास असून दोघे एक शब्दही बोलले नाहीत. Gehlot and Pilot did not speak a word to each other for an hour and a half on the same platform


विशेष प्रतिनिधी

जयपूर : राजस्थानात कॉंग्रेसच्या अडचणी अद्यापही संपल्या नसल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातून विस्तवही जात नाही. जयपूरमध्ये एकाच व्यासपीठावर दीड तास असून दोघे एक शब्दही बोलले नाहीत.

 

कृषी कायद्यांच्या विरोधात राजस्थान सरकारने रविवारी किसान बचाओ, देश बचाओ अभियानाअंतर्गत धरणे आंदोलन केले. यामध्ये सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच अशोक गेहलोत आणि सचिन पायलट एका व्यासपीठावर आले.यापूर्वी १२ ऑगस्टला वरिष्ठ कॉंग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी त्यांना एकत्र आणले होते. मात्र, त्यांच्यातील दुरावा अद्यापही संपला नसल्याचेच उघड या आंदोलनातून उघड झाले आहे. जयपूरमधील हुतात्मा स्मारकावर पायलट यांच्यानंतर अशोक गेहलोत एक तास उशिरा पोहोचले. पायलट पूर्ण वेळ शेजारी बसलेले मंत्री लालचंद कटारिाया यांच्याशीच बोलत होते. गेहलोत यांच्या भाषणाच्या वेळी सचिन पायलट जिंदाबादच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे गेहलोत चांगलेच चिडलेही. पायलट यांनी आपल्या भाषणात जुन्या गोष्टी विसरून जाण्याचे आवाहन केले, मात्र गेहलोत यांच्याशी बोलण्याचे सौजन्य दाखविले नाही. या वेळी व्यासपीठावर असलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटसरा सतत दोघांच्यात काहीतरी बोलणे होईल, असा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनाही यश मिळाले नाही.

Gehlot and Pilot did not speak a word to each other for an hour and a half on the same platform

एवढेच नव्हे तर दोघांचेही कार्यकर्त्यांचे गट वेगेवेगळे बसले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात राजस्थान सरकार संकटात सापडले होते. सचिन पायलट यांनी आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर कॉंग्रेस नेतृत्वाने दोघांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही दोघांची मने जुळली नाहीत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*