Gautala Autramghat Sanctuary: वाघोबाचा ४५० किमीचा प्रवास; ८१ वर्षांनंतर औरंगाबादजवळच्या गौताळ्यात ‘देशी टायगर’.. प्राणीप्रेमी खूष

  • Gautala Autramghat Sanctuary मध्ये दीड महिन्यापासून वाघोबाचा वावर असल्याचा वनअधिकाऱ्यांचा अंदाज

  • मराठवाड्यातील गौताळ्यातील अभयारण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका वाघाबाने आपला मुक्काम ठोकला आहे. वन विभागाच्या ‘ट्रॅप’ कॅमेऱ्यात तो कैद झाला असून, त्यांच्या सर्व हालचालींवर वन विभागाकडून बारीक नजर ठेवली जात असल्याची माहिती आहे . हा वाघ तीन वर्षांचा असून, विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत आल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • गेल्या वर्षीही टिपेश्वरमधीलच आईपासून विभक्त झालेला एक वाघ अजिंठा, फर्दापूर परिसरात आढळून आला होता.

  • पांढरकवठा येथून ४५० किलोमीटरचा प्रवास करुन वाघ आला असल्याचं वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांचा या नर वाघाचे ठसे तुषार पवार या वन्यजीवप्रेमी आणि खवल्या मांजरावर संशोधन करणाऱ्या तरुणाला आढळून आल्यानंतर ही बाब त्याने वनविभागाला सांगितली. तत्पूर्वी वनविभागातील एका कर्मचाऱ्यासही या भागात वाघाचे ठसे असावेत अशी शंका आली होती.

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : एखाद्या ठिकाणचा मूळ प्राणी विविध कारणांनी विलुप्त होतो ते नक्कीच हृदयद्रावक असते. तथापि, जेव्हा त्यांना पुन्हा स्पॉट केले जाते, तेव्हा तो क्षण वन्यजीव प्रेमींसाठी आनंददायी ठरतो.

असाच दुर्मीळ क्षण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा औट्रमघाट अभयारण्यात अनुभवण्यास मिळाला आणि तब्बल 81 वर्षानंतर येथे वाघ दिसला. 1940 नंतर या ठिकाणी वाघ लुप्त झाले होते.Gautala Autramghat Sanctuary: 450 km journey to Waghoba; ‘Desi Tiger’ in Gautala after 81 years; Happy ‘Animal Lovers’

कन्नड तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका परिसरात गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.

या भागात बिबट्या, काळवीट, निलगाय, सायाळ यासह १९ सस्तन प्राणी आणि सरपटणारे प्राणी प्रामुख्याने आढळतात; तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, वनसंपदा येथे आहे.

मराठवाड्यातील सर्वांत मोठे असलेल्या या अभयारण्यात गेल्या काही दिवसांपासून एका वाघाने आपला मुक्काम ठोकला आहे. अंदाजे दोन महिन्यापासून त्याचा प्रवास सुरू आहे. पांढरकवडा, नांदेड, किनवट, परभणी, जालना, अजिंठामार्गे तो गौताळ्यात आला आहे.

दरम्यान बुलढाण्यावरुन एक वाघ रेंजच्या बाहेर गेल्याने त्याचा शोध सुरू होता. या दरम्यान गौताळयातील या वाघाची माहिती गोळा करण्यात आली. तो पांढरकवडा भागातून गौताळा येथे आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाघाचे पंजे दिसून आल्यानंतर त्याला अधिवास आहे काय, याचा शोध घेण्यासाठी कॅमेरा देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. त्यात त्याचे छायाचित्र कैद झाले. गौताळा क्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी राहुल शेवाळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

गौताळा अभयारण्यात बिबटयांचा अधिवास आहे पण वाघाच्या पाऊलखुणा अलीकडेच दिसून आल्या. आईपासून वेगळे झाल्यानंतर स्वत:चे क्षेत्र ठरविण्यासाठी त्याने ४५० किलोमीटरचा प्रवास केला असावा.

तो फिरस्ती वाघ असल्याने मराठवाड्यात त्याचा अधिवास होईल काय याविषयी शंका आहेत. पण मादी वाघ या भागात आली तर तो गौताळा अभयारण्यात राहू शकतो असे सांगण्यात येत आहे. गौताळा अभयारण्य वाघांच्या अधिवासास उपयुक्त आहेत.

नैर्सगिक आणि कृत्रिम पाणवठे आणि अन्नसाखळी या भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातच गौताळा हे मोठे वनक्षेत्र आहे. अन्य मराठवाड्यातील एकूण क्षेत्रफळाच्या केवळ ०.४ वनक्षेत्र आहे.

Gautala Autramghat Sanctuary: 450 km journey to Waghoba; ‘Desi Tiger’ in Gautala after 81 years; Happy ‘Animal Lovers’

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*