गँगस्टर विकास दुबेच्या एन्काउंटरला नितीन राऊतांनी दिला जातीय अँगल


विशेष प्रतिनिधी 

नागपूर : आठ पोलिसांचा हत्यारा गँगस्टर विकास दुबे याच्या एन्काउंटरला महाराष्ट्राचे मंत्री काँग्रेसचे विदर्भातील नेते नितीन राऊत यांनी घृणास्पद जातीय अँगल दिला आहे.

विकास दुबेला मारल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला ब्राह्मण हत्येचे पाप लागेल, अशी कुजबूज रेशीमबागेजवळ एेकू येत आहे, अशी जातीय टीका करणारे ट्विट नितीन राऊत यांनी केले आहे.

विकास दुबेच्या एन्काउंटर टोचणारे नितीन राऊत हे काही एकटेच काँग्रेस नेते नाहीत. त्यांच्या आधी प्रियांका गांधी यांनीही असेच खोचक ट्विट करून दुबेच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह लावले आहे. त्यांच्या पाठोपाठ दिग्विजय सिंह आणि अन्य काँग्रेस नेते तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्याचीच री ओढणारे ट्विट केले.

दुबेने आठ पोलिस मारले त्यावेळी हे नेते भावूक झाले नव्हते तेवढे भावूक होत त्यांनी दुबेच्या एन्काउंटर झाल्यानंतर ट्विट केले आहेत. नितीन राऊत यांनी त्यावर कडी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मुख्यालयाशी जोडत दुबेच्या एन्काउंटरला घृणास्पद जातीय अँगल देणारे ट्विट केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था