फडणवीसांची गांधीगीरी : वीजेचे कनेक्शन कापण्यासाठी कुणी आले तर त्याला गुलाबाचे फूल द्या


विशेष प्रतिनिधी

भंडारदरा : कोरोना काळातील वाढीव वीजबिलांवर राज्य सरकारने आधी दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यानंतर राज्य सरकारने यु-टर्न घेतला आहे. दरम्यान, वीजबिल न भरल्यास वीज कापण्यात येईल असं महावितरणतर्फे सांगण्यात येत आहे. Gandhigiri of Fadnavis Electricity connection

यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर उपाय सुचवताना देवेंद्र फडणवीस यांनी गांधीगीरी करण्याचा सल्ला दिला आहे.


जनतेने विश्वासानं तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? बाळासाहेबांंच्या जयंतीदिनी देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली आठवण


महाविकास आघाडीविरोधात भाजपने विदर्भात आंदोलन पुकारले आहे.भाजपच्या आंदोलन सभेत बोलताना विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

‘ सामान्य नागरिकांना वीजबिल माफी देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. मग या सरकारने मुंबई व पुण्यातील बिल्डरांना प्रीमियममध्ये सूट देण्यासाठी 5 हजार कोटी रुपये कुठून आणले ? कोणत्याही गावात अधिकारी वीज जोडणी तोडण्यासाठी आल्यास त्यांना गुलाबाचं फुल द्या आणि गाडीत बसवून परत पाठवा’ असं आवाहन देखील फडणवीसांनी यावेळी केलं आहे.
कुणाचीही वीज कापण्याची सक्ती कुणाला करू देणार नाही, ही जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे,’ अशी सुचना त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

Gandhigiri of Fadnavis Electricity connection

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था