गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधानांची विद्यार्थ्यांना भेट, शाळांमध्ये स्वच्छ पाणी मिळणार

गांधी जयंतीपासून देशभरातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळांमधून शुद्ध पाणी मिळावे यासाठी 100 दिवसांची मोहीम सुरू करावी. सार्वजनिक संस्थांमध्ये नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जावे यासाठी या मोहिमेचा अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गांधी जयंतीपासून देशभरातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळांमधून शुद्ध पाणी मिळावे यासाठी 100 दिवसांची मोहीम सुरू करावी. सार्वजनिक संस्थांमध्ये नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जावे यासाठी या मोहिमेचा अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील बालकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी देशभरातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 100 दिवसांच्या विशेष अभियानाचा शुभारंभ केला.

या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, बालकांना जलयुक्त आजारांची लागण होण्याची जोखीम जास्त असल्यामुळे त्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देणे याला प्राधान्य आहे, म्हणून शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य सेवा केंद्रांमध्ये नळाच्या पाण्याद्वारे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत तरतुदी केल्या आहेत. या मोहिमेदरम्यान, पुढच्या 100 दिवसांत गावातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि इतर सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा ठराव संमत करण्यासाठी ग्रामसभा लवकरात लवकर बोलावण्यात येतील.

ही मोहीम बालकांसाठी सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारी आणि त्यांच्या आरोग्यावर आणि एकूणच विकासावर सकारात्मक परिणाम करणारी ठरेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त त्यांना ही योग्य आदरांजली आहे, असे उद्गार मोदी यांनी यावेळी काढले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*