जी – २३ काँग्रेस नेत्यांचा जम्मूतून बंडाचा बुलंद झेंडा; गुलामनबी म्हणाले, राज्यसभेतून रिटायर झालोय, राजकारणातून नाही!!, पण हा इशारा नेमका कोणाला??

वृत्तसंस्था

जम्मू : काँग्रेसच्या नेतृत्त्वावरून घराणेशाहीवर तडाखेबंद पत्र लिहिणाऱ्या काँग्रेसच्या जी -२३ नेत्यांनी आज दिल्लीऐवजी जम्मूत येऊन बंडाचा झेंडा बुलंद केला. काँग्रेस कमजोर होत चाललीय, तुम्ही काय करता, असा अप्रत्यक्ष सवाल करीत ग्रुप २३ च्या या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. G – 23 leaders in jammu gulam nabi azad kapil sibal anand sharma raj babbar targets Gandhi family

काँग्रेसच्या कमजोरीवर पक्षाचे नेतृत्त्व उपाययोजनाच करीत नसल्याची  नाराजी या नेत्यांनी आधी पत्र लिहून व्यक्त केली होती. पण त्यानंतरही काहीच न झाल्याचा उद्वेग आणि संताप या सगळ्यांच्या भाषणातून दिसला. गांधी खानदानाच्या नेतृत्त्वावर त्यांनी राग काढून घेतला. गुलामनबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, राज बब्बर यांनी आपल्या जोरदार भाषणांमधून काँग्रेस नेतृत्वाला आतातरी काही करा, असा कठोर संदेशही दिला.गुलाम नबी आझाद म्हणाले, की मी राज्यसभेतून रिटायर झालोय. राजकारणातून नाही. जम्मू – काश्मीरच्या जनतेसाठी मी आत्तापर्यंत संसदेत आवाज बुलंद केला. आता रस्त्यावर येऊन करेन. ३७० हटविल्यानंतर राज्याचा गमावलेला दर्जा मिळविण्यासाठी संघर्ष करेन. गुलामनबींच्या राजकारणातून रिटायर झालोय, या विधानाचा नेमका अर्थ काय, याची चर्चा लगेच सोशल मीडियात सुरू झाली. हा इशारा त्यांनी नेमका कोणाला दिला आहे…

काँग्रेसचे नेतृत्त्व अजूनही त्यांचे आणि जी – २३ नेत्यांचे ऐकत नाही का… वगैरे चर्चा सुरू झाली. गुलामनबींना राज्यसभेतून रिटायर केल्यानंतर त्यांना काँग्रेस नेतृत्त्वाने कोणतेच पद दिले नाही. त्याची खंत जी – २३ च्या नेत्यांच्या भाषणातून जाणवली.

सगळ्यांमध्ये आनंद शर्मांचे भाषण जोरदार झाले. ते म्हणाले की, आम्ही काँग्रेसमध्ये आहोत की नाही किंवा राहायचे की नाही, हे सांगण्याचा मी कोणालाही अधिकार दिलेला नाही. आम्ही खूप संघर्ष करून इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. कोणत्या खिडकीतून उडी मारून आम्ही काँग्रेसमध्ये आलेलो नाहीत. आम्हाला सुनावण्याचा कोणालाही अधिकार नाही. आम्ही पक्ष बांधणी करू. काँग्रेसला मजबूत करू. काँग्रेसच्या मजबूतीवर आणि ऐक्यावर आमचा विश्वास आहे.

आनंद शर्मा यांनी खिडकीचा उल्लेख करून नेमका कोणावर निशाणा साधला, याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. अनेकांनी त्यांचे बोट प्रियांका गांधीकडे असल्याचा निष्कर्ष काढला. पण सगळ्या नेत्यांनी गांधी घराण्याला पुरते घेरणारी भाषणे केली ही वस्तुस्थिती यातून समोर आली.

कपिल सिब्बल म्हणाले, की काँग्रेस कमजोर होत चाललीय ही वस्तुस्थिती आहे. तिला मजबूत करण्यासाठीच आम्ही येथे जमलेलो आहोत. आम्हाला एकत्र राहून पक्ष मजबूत करायचा आहे. अशा वेळी गुलामनबी आझादांचा रोल काय… ते इंजिनिअर आहेत. ते बऱ्याच गोष्टी दुरूस्त करू शकतात, याक़डे सिब्बल यांनी लक्ष  वेधले.

काँग्रेसच्या २३ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष पाहिजे, म्हणून सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. त्या पत्रातील भाषा थोडी कडक होती. त्यावेळी या नेत्यांना जी – २३ म्हणजे ग्रुप – २३ असे नाव पडले. आजच्या भाषणांमध्ये जी – २३ नेत्यांची भाषा त्यावेळच्या पत्रापेक्षा जास्त कडक आणि काँग्रेस नेतृत्त्वाला गंभीर इशारे देणारी होती.

G – 23 leaders in jammu gulam nabi azad kapil sibal anand sharma raj babbar targets Gandhi family

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*