‘फ्लाईंग बॅट, ब्रेकिंग बॅट, क्रॅकिंग बॅट!’….आयसीसी ने पोस्ट केलेला मजेदार व्हिडिओ तुफान व्हायरल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: क्रिकेट म्हणजे थरार…क्रिकेट म्हणजे क्षणांक्षणात वाढणारी उत्कंठता …क्रिकेट च्या मैदानात अनेक मजेशीर घटना घडत असतात. मग कधीन मजेशीरपद्धतीने झेल सुटतो, कधी दोन फलंदाज धावा घेताना एकाच दिशेने पळतात…कधी दादा शर्ट काढून विजयोत्सव साजरा करतो तर कधी भज्जी मैदानावर डांस करत विकेट घेतल्याचे आनंद व्यक्त करतो…कधी सचिन शोएबला आपल्या शॉट ने उत्तर देतो…अशा एक ना अनेक अविस्मरणीय घटना मनामनांत साठून राहिलेल्या आहेत… Funny video storm viral posted by ICC

अशा काही घटना असतात ज्यामुळे प्रेक्षकांना हसू आवरत नाही. क्रिकेट मैदानावर अनेकदा घडणारी घटना म्हणजे फलंदाजाची बॅट तुटणे किंवा उडून दुसरीकडे पडणे. याचाच एक व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की काही फलंदाजांची बॅट चेंडू मारताना दुसरीकडे उडून पडली. यात सौरव गांगुली, रिषभ पंत, तिलत्करने दिल्शान अशा काही फलंदाजांची बॅट उडून पडताना दिसत आहे.तर काहींच्या बॅटला चेंडूला फटका मारल्यानंतर तडा गेला आहे.

तर काहींची बॅट जमीनीला घासून तुटली आहे. यात महेला जयवर्धने, ओएन मॉर्गन अशा काही फलंदाजांचा समावेश आहे.

या व्हिडिओला आयसीसीने मजेशीर कॅप्शन दिले आहे की ‘फ्लाईंग बॅट, ब्रेकिंग बॅट, क्रॅकिंग बॅट!’ याबरोबरच आयसीसीने पुढे गमतीने लिहिले आहे की ‘आयसीसी ऍडमिनने एक वेगळा व्हिडिओ करायला व्हिडिओ एडिटरला सांगितले. त्यावर व्हिडिओ एडिटर म्हणाला, नक्की काय करायचे आहे? यावर आयसीसी ऍडमिनने उत्तर दिले की तू आयसीसी स्पर्धांमधील बॅट तुटलेले आणि उडालेल्या बॅटचे व्हिडिओ शोधू शकतो का?’

या व्हिडिओला आयसीसीने थोडे एडिट करुन त्याला काहीसे गमीतीशीर केले आहे. ह्या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून त्यावर विविध प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

Funny video storm viral posted by ICC

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था