औरंगाबादच्या हज हाऊसचा निधी 29.88 कोटीपर्यंत वाढविला ; शिवसेनेला घटक पक्षांच्या बेगडी धर्मनिरपेक्षतेचा लागला गुण

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच शिवसेनेचे मुस्लिम प्रेम अधिकच उफाळून आले आहे. आता तर औरंगाबाद येथे हज हाऊस बांधण्यासाठी निधी वाढविल्याचा शासन आदेशच काढला आहे.Funding of Haj House, Aurangabad 29.88 crore; The Shiv Sena felt the virtue of secularism of the constituent parties

त्यामुळे एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बेगडी धर्मनिरपेक्षतेचा गुण लागल्याचे स्पष्ट होत आहे.औरंगाबाद येथे हज हाऊस बांधण्यासाठी ठाकरे – पवार सरकारने 19.50 कोटींचा निधी देण्याचे यापूर्वी जाहीर केले होते. आता त्या निधीत वाढ करून तो 29.88 कोटी एवढा केला आहे. या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात ही बाब उघड झाली आहे.

एकंदरीत आक्रमक हिंदुत्वाचा एकेकाळी पुरस्कार करणारी शिवसेना आता मवाळ बनली आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनल्यानंतर शिवसेनेची अवस्था ढवळ्या शेजारी बांधला पवळा.

वाण नाही पण, गुण लागला, या प्रमाणे झाली आहे. ती अधिकच मुस्लिम प्रेमी बनल्याचे हज हाऊसच्या निधीच्या वाढीवरून स्पष्ट होत आहे.

Funding of Haj House, Aurangabad 29.88 crore; The Shiv Sena felt the virtue of secularism of the constituent parties

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*