मातोश्री’वरून कॉंग्रेस मंत्री शिवसेना मंत्र्याला म्हणाले, बेडकाप्रमाणे विचार करणे सोडा

अनैसर्गिक युती असलेल्या कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये पटत नसल्याचे दर्शन वारंवार सार्वजनिकरित्या घडत आहे. विचारधाराच वेगळ्या असल्याने एकाच व्यासपीठावरही त्यांच्यातील मतभेद समोर येत आहेत. याचाच दाखला नुकताच नागपुरात मिळाला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना बेडकाप्रमाणे विचार न करण्याचा सल्ला कॉंग्रेस मंत्री नितीन राऊत यांनी दिला.From Matoshri the Congress minister told the Shiv Sena minister stop thinking like a frog


प्रतिनिधी

नागपूर : अनैसर्गिक युती असलेल्या कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये पटत नसल्याचे दिसून येत आहे. विचारधाराच वेगळ्या असल्याने एकाच व्यासपीठावरही त्यांच्यातील मतभेद समोर येत आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिक्षणासंदर्भात केलेल्या घोषणांबाबत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सार्वजनिक व्यासपीठावर आक्षेप घेतला.डराव डराव करणाऱ्या मंडुकाप्रमाणे म्हणजे बेडकाप्रमाणे नव्हे, तर सागरासारखे विचार करायला हवेत, असा सल्ला राऊत यांनी सामंत यांना दिला. सरकारमधील मंत्रीच एकमेकांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नागपूर येथील कवी कालिदास संस्कृत विद्यापीठात आयोजित एका समारंभात दोन मंत्र्यांमधील मतभेद जाहीर झाले.

संस्कृत विद्यापीठात शुक्रवारी ‘मातोश्री’ या विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामंत यांनी दोन घोषणा केल्या. यात सर्व वसतिगृहांना ‘मातोश्री’ नाव देणे व संस्कृत संशोधनाला वेग मिळावा यासाठी राज्यात संस्कृतचे चार उपकेंद्र सुरू करणे यांचा त्यात समावेश होता. यासोबतच महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुंबईऐवजी रामटेकमध्ये करण्याचीदेखील त्यांनी घोषणा केली.

मात्र, राऊत यांनी संस्कृत विद्यापीठात केवळ संस्कृतचे अध्ययन व संशोधनावरच जोर देण्याच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. पाली, प्राकृत व इतर भाषांचादेखील विचार झाला पाहिजे. कवी कालिदासांबाबत बोलत असताना नागार्जुनचा विसर पडायला नको.

त्यांचेदेखील महत्त्व सांगायला हवे. संस्कृत विद्यापीठाची स्थापना करण्यामागे केवळ संस्कृतच नव्हे, तर इतर भाषांचा विचारदेखील करण्याबाबत संकल्पना होती. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलावून विद्यापीठाचा कायदा बदलण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला.

महिला वसतिगृहांना ‘मातोश्री’चे नाव देण्यावरून राऊत म्हणाले की, विचार हे सागराप्रमाणे विशाल असायला हवेत. डराव डराव करणाऱ्या मंडुकांप्रमाणे विचार नकोत. सागरामध्ये मोठा देवमासादेखील आला तरी त्याचा समावेश करण्याची क्षमता असली पाहिजे. जोपर्यंत सागराप्रमाणे विचार करण्याची क्षमता विकसित होत नाही, तोपर्यंत विद्यापीठाचा विकास होऊ शकत नाही.

From Matoshri the Congress minister told the Shiv Sena minister stop thinking like a frog

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*