Four parties demands Presidential rule in Maharashtra over Corruption Alligaitions On MVA Govt

Presidential Rule : लोकसभेत चार पक्षांची महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

Presidential Rule : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, स्फोटक प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी सचिन वाझे यांना अटक, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे थेट गृहमंत्र्यांचा भ्रष्टाचाराचे आरोप अशा एकापाठोपाठ घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आतापर्यंत चार पक्षांनी लोकसभेत मागणी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, स्फोटक प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी सचिन वाझे यांना अटक, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे थेट गृहमंत्र्यांचा भ्रष्टाचाराचे आरोप अशा एकापाठोपाठ घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आतापर्यंत चार पक्षांनी लोकसभेत मागणी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपतींच्या राजवटीची मागणी केली. रामदास आठवले अमित शहा यांना पत्र देणार आहेत. नवनीत राणा यादेखील राष्ट्रपती राजवटीसाठी पत्र लिहीत आहेत. प्रकाश आंबेडकरही याचसंदर्भात राज्यपालांची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडीदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांना इशारा दिलाय की, जर राष्ट्रपती राजवट लागू केली गेली, तर त्या आगीत तुमचेही हात जळतील.

लोकसभेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

लोकसभेत लेटर बॉम्बचा मुद्दा उपस्थित करणारे पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. सरकार खंडणीखोर झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट आवश्यक झाली आहे. लोकसभेतील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही शिवसेनेवर आरोप केला आहे की, राज्यात निलंबित अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत का नियुक्त केले गेले आहे? राज्य सरकारने सचिन वाझेसाठी परमबीर सिंहांची बदली केली.

खासदार नवनीत राणा यांनी वसुली प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केला की, सर्व काही त्यांच्या आशीर्वादाने केले जात आहे. त्या म्हणाल्या की, 100 कोटींच्या वसुलीचा व्यवसाय फक्त मुंबईत आहे, यावरून राज्यातील स्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. भाजप खासदार पूनम महाजन म्हणाल्या की, महिन्याला 100 कोटी म्हणजे वर्षामध्ये 1200 कोटी. गृहमंत्री एका एपीआयकडून इतक्या पैशांची मागणी करत आहेत. त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुनगंटीवारांनी राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागितली

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, राज्यात कायदा व सुव्यवस्था नाही. जनतेचे विजेचे बिल माफ केले जाऊ शकत नाही, बार आणि दारू विक्रेत्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. भ्रष्टाचार शिगेला पोचला आहे. पोलिसांचे मनोबल घसरले आहे. आताची परिस्थितीत 1980 सारखी झाली जेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. म्हणून मी राज्यपालांना विनंती करतो की, राज्याच्या मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडून सविस्तर अहवाल मागवावा व महामहिम राष्ट्रपती यांना कळवावे.

ते म्हणाले की, परमबीर सिंगचे प्रकरण वरवर पाहिले जाऊ नये. परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, ज्या पोलिस अधिकाऱ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या आहेत त्यापैकी कोणीही परमबीर सिंग यांचे वक्तव्य नाकारलेले नाही.

रामदास आठवलेंनीही केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

रिपाइं नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या कारणास्तव राजीनामा द्यावा, उलट त्यांनी तो आतापर्यंत द्यायला हवा होता, असे म्हटले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. मी राज्यात राष्ट्रपतीच्या राजवटीची मागणी करतो, असेही ते म्हणाले. यासंदर्भात ते अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांनी घेतली राज्यपालांची भेट

दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आणि सोमवारी राज्यपालांना यासंदर्भात भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांनी दिशा सालियन, सुशांतसिंग राजपूत, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येला आत्महत्या म्हणून संबोधण्याचा मुद्दा उपस्थित केला. परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल ते म्हणाले की, हे पैसे कुठे गेले याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. राज्यात जी परिस्थिती आहे, त्यामुळे राष्ट्रपती राजवट आवश्यक झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*