Mansukh Hiren Death Case NIA imposes UAPA act on Sachin Waze

वाझेंच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली, एनआयएची कोर्टात धक्कादायक माहिती ; 25 काडतुसे गायब

सहायक निरीक्षक सचिन वाझेंभोवतीचा फास आणखीनच आवळला गेला आहे. Found 62 Bullets From Arrested Cop’s House: NIA In Ambani Bomb Scare


विशेष प्रतिनिधी 

मुंबई: सहायक निरीक्षक सचिन वाझेंच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली आहेत. ही काडतुसे घरात का ठेवली होती? याचे उत्तर वाझे देत नसल्याचं एनआयएने विशेष कोर्टाला सांगितलं आहे.

त्यामुळे वाझेंकडे ही काडतुसे आली कुठून? आणि त्यांनी ही काडतुसे का ठेवली आहेत? याबाबतचं गूढ वाढलं आहे. Found 62 Bullets From Arrested Cop’s House: NIA In Ambani Bomb Scare

सचिन वाझेंची आज कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. सचिन वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती.

30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने कोर्टाला दिली.तपासात सहकार्य नाही

यावेळी एनआयएने सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं कोर्टाला सांगितलं. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे. त्याशिवाय वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे.

तसेच वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे फोरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत.

शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने 12 लाख रूपये दिले होते.

त्याचीही माहिती घ्यायची असल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं आहे. याशिवाय वाझेंच्या आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे.

Found 62 Bullets From Arrested Cop’s House: NIA In Ambani Bomb Scare

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*