Former Union Minister Dilip Gandhi dies due to corona Infection in private hospital in Delhi

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन, दिल्लीतील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 70 वर्षांचे होते. दिलीप गांधी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. Former Union Minister Dilip Gandhi dies due to corona Infection in private hospital in Delhi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 70 वर्षांचे होते. दिलीप गांधी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासून ते दिल्लीतच वास्तव्यास होते. प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्यांनी नुकतीच करोना चाचणी करून घेतली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर ते मंगळवारी रुग्णालयात दाखल झाले होते. दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.दिलीप गांधी सलग तीन वेळा नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. 1999 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. 2003 ते 2004 या काळात केंद्रातील भाजप सरकारमध्ये ते जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री होते. आपल्या प्रभावी जनसंपर्क आणि संघटनशक्तीसाठी ते ओळखले जायचे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना त्यांनी नगरमध्ये आणले होते.

अहमदनगर शहराच्या राजकारणातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. भाजपचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. नगरपालिका असताना नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पुढाकारातून सध्या राष्ट्रवादीला सोबत घेत महापालिकेत भाजपची सत्ता आहे. खासदारपदी असतानाच त्यांनी शहरासह ग्रामीण भागातही अनेक योजना आणल्या. कट्टर भाजप कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी नेते अशी त्यांची ओळख होती. यामुळे जिल्ह्याने हिंदुत्ववादी नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Former Union Minister Dilip Gandhi dies due to corona Infection in private hospital in Delhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*